एक्स्प्लोर
माथेरानमध्ये सेल्फी घेताना विवाहितेचा दरीत कोसळून मृत्यू
सेल्फी काढताना तोल गेल्याने दरीत कोसळून दिल्लीच्या 35 वर्षीय महिलेचा माथेरानमध्ये मृत्यू झाला.

रायगड : सेल्फी घेण्याच्या नादात सुरक्षिततेकडे केलेलं दुर्लक्ष कसं जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. माथेरानमध्ये सेल्फी काढताना दरीत कोसळून 35 वर्षीय महिलेला प्राण गमवावे लागले.
दिल्लीत राहणाऱ्या 35 वर्षीय सरिता चौहान मंगळवारी आपल्या पती आणि मुलांसोबत माथेरानला फिरायला आल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सरिता कुटुंबासोबत लुईसा पॉईंटवर फिरायला गेल्या होत्या.
लुईसा पॉईंटवर सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीजवळ असलेला कठडा ओलांडून सरिता आणि त्यांचा पती सेल्फी काढण्यासाठी गेले होते. याचवेळी आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे सरिता यांचा तोल गेला आणि त्या दरीत कोसळल्या.
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माथेरानमधील बचाव पथक आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सकाळी सरिता यांचा मृतदेहच सापडला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
