Narendra Patil: उद्धव ठाकरे इतका घातकी माणूस महाराष्ट्रात कोणीही नाही; माथाडी नेते नरेंद्र पाटलांची घणाघाती टीका
उद्धव ठाकरे इतका घातकी माणूस महाराष्ट्रात कोणी नाही. संपूर्ण मराठी माणसाचा घात या उद्धव ठाकरेंनी केला असल्याची टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
Maratha Reservation मुंबई : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) फार काही कळत नाही. त्यांनी त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करूनच बोलले पाहिजे. मराठ्यांना 16 टक्के आरक्षण हे त्यांच्या काळात दिले गेले नव्हते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना खरी ताकद देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली होती. मात्र, ज्या मोहिते पाटील यांचे घर शरद पवारांनी फोडले म्हणून टीका करत होते, तेच आज शरद पवारांकडे जाऊन बसले आहेत. अशी सणसणीत टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर केली आहे.
.... तर त्याच वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते- नरेंद्र पाटील
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे इतका घातकी माणूस महाराष्ट्रात कोणी नाही. संपूर्ण मराठी माणसाचा घात या उद्धव ठाकरेंनी केला असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्यावेळी घेतला असता तर त्याच वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. अजूनही उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी जाहीर करावे, की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ. तशा पद्धतीचे पत्रक त्यांनी जर काढले तर त्यांच्या बोलण्यावर आम्हाला विश्वास ठेवता येऊ शकतो. असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
जरांगेंच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरु होणार?
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे समर्थकांना दसरा मेळाव्यातून संबोधित करतात. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करतात. शिवसेना फुटीनंतर तर एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्यातून शक्तिपर्दर्शन करण्याची संधी सोडली नाही. त्यात आता मनोज जरांगे पाटलांचा दुसरा दसरा मेळावा नारायणगड येथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख दसरा मेळावे
1. शिवसेना (उबाठा) शिवाजी पार्क.
2.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीमबाग, नागपूर.
3. मुख्यमंत्री एककनाथ शिंदे, आझाद मैदान, मुंबई.
4. पंकजा मुंडे, सावरगाव घाट.
इतर महत्वाच्या बातम्या