मुख्यमंत्र्यांचे नाव नाकारून शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण हे उद्धव ठाकरेंनीच करावं असा जनतेचाच आग्रह: संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूप पुतळ्यांचे ते आज अनावरण करणार आहेत.
Maharashtra Politics मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) अश्वरूप पुतळ्यांचे ते आज अनावरण करणार आहेत. कळमेश्वर नगरपालिकेच्या माध्यमातून या अश्वरूप शिवरायांच्या पुतळ्याची आज उभारणी होत आहे. असे असताना कळमेश्वर नगरवासीयांची अशी इच्छा होती की, जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पुतळ्याचे अनावरण करणार नाही, तोपर्यंत या पुतळ्याच्या अनावरणाचे कार्य होणार नाही.
त्यामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा पुतळा त्या समितीने आणि नागरिकांनी झाकून ठेवला होता. मात्र छत्रपतींचा पुतळा अशा पद्धतीने झाकून ठेवणे हे योग्य नव्हतं. त्यामुळे आज उद्धव ठाकरे हे पवित्र कार्य करत आहेत. मधल्या काळात राज्याचे मुख्यमंत्री यांनी या पुतळ्याचे अनावरण करावे, असे एक मत पुढे आले होते. त्यात अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे देखील नावे पुढे आली होती. मात्र जनतेने मुख्यमंत्र्यासह हे सर्व नावे नाकारली आहेत आणि पुतळ्याच्या अनावरण हे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच करतील, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आजचा दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे आज संध्याकाळी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.
उद्धव ठाकरे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, विदर्भात राजकीय खळबतं!
मालवणच्या दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे होणारे हे पहिलेच अनावरण आहे. मालवणच्या दुर्घटनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला त्यामुळेच तो पुतळा कोसळला. अशात मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की प्रचंड वेगाच्या वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. मात्र जो अहवाल आला, त्यात असे म्हटले आहे की पुतळा निर्मितीच्या कार्यात अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरला गेलं. सोबतच पुतळा उभारत असताना त्या जागेची व्यवस्थित व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे साहित्य कशाप्रकारे गंजल आणि त्यातूनच हा पुतळा कोसळला, हे सर्वांपुढे आलं. मात्र कळमेश्वर च्या पुतळ्याबाबत आम्ही पाहणी केली माहितीनुसार या पुतळ्याची योग्य पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे हे या पुतळ्याचे आज अनावरण करणार आहेत.
हा कार्यक्रम आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे विदर्भ आणि नागपुरातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेणार आहेत. आमचा पक्षाचे संभाव्य उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे त्याचा आढावा उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून घेणार आहेत आणि त्यानंतर ते परत मुंबईला येणार असल्याची माहिती ही खासदार संजय राऊत यांनी दिली.
हे ही वाचा