एक्स्प्लोर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मोठा अपहार, सिनेट सदस्याचा आरोप

विद्यापीठात कोरोना लॅबच्या खरेदीत तसेच इतर अनेक कामांत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोरोना लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असून कुलगुरुंच्या वाहनाच्या चॉईस नंबरसाठी हजारो रुपये मोजण्यात आल्याचा आरोप विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि युवा सेनेचे कार्यकर्ते प्रा.सूरज दामरे यांनी केलेत.

कोरोना लॅबमध्ये अपहार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या covid-19 लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्यात आले होते. यामध्ये मोठया प्रमाणात अपहार झाला असल्याचं प्रा.सूरज दामरे यांनी सांगितलं. यासंबंधी आवश्यक असलेलं कोटेशन मागवण्यात आलं नाही आणि ई-निविदाही काढण्यात आल्या नाहीत. आरोपही त्यांनी केला. या कामात परस्पर खरेदी करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला गेल्याचा आरोप विद्यापीठाच्या सिनेट सदस्याने केला आहे.

कोविडच्या लॅबच्या उभारणीत आणि साहित्य खरेदीतील घोळाची यादीच दामरे यांनी दिली आहे. लॅब उभारणी करण्यासाठी एक कोटी सात लाख 85 हजारचा निधी मंजुर झाला होता. शासकीय आदेशानुसार सदर काम हे ई-निविदा प्रसिद्ध करुन, कार्यारंभ आदेश असे कोणतेही नियम न पाळता हे काम करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितलं.

यामध्ये पीपीई किट आणि मास्कचे दर वाढीव लावण्यात आले आहेत. अनेक वेळा त्याच्या दरात तफावत दिसून येत. विशेष बाब खरेदी करण्यात आलेली दुकाने मात्र ठराविकच आहेत. पीपीई किट 1000 रुपये अधिक 5 टक्के gst सह तर कधी 795 रुपयांना खरेदी केले आहेत. N-95 मास्कचा दर 230 अधिक 5 टक्के gst तर कधी 191 तर कधी 241 रुपये दराने खरेदी करण्यात आले आहेत.

दोन नवीन गाड्या आणि व्हीआयपी नंबर विद्यापीठ कुलगुरुकडे दोन महागड्या गाड्या असताना त्यांनी विद्यापीठाच्या पैशातून दोन नवीन गाड्या घेतल्या असल्याचा धक्कादायक आरोप प्रा.सूरज दामरे यांनी केला. एवढंच नाही तर व्हीआयपी नंबर साठी चक्क 50 हजार रुपये मोजल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आधीच्या गाड्यांच्या नंबरसाठीही अनावश्यकरित्या हजारो रुपये मोजण्यात आले आहेत असे प्रा.सूरज दामरे यांनी सांगितलं.

याच काळात विद्यापीठ परिसरात बंधाऱ्याचं बांधकाम करण्यात आलं आहे. यासाठी अंदाजित खर्च हा बारा लाख अपेक्षित होता मात्र काम 6 लाख 54 हजारात पूर्ण करण्यात आलं आहे. यासाठी कोणत्याही स्वरुपातील तांत्रिक मान्यता घेण्यात आली नाही, ई-निविदा काढण्यात आली नाही.या कामाचं एमबी रेकॉर्ड ही केलं नसल्याचा आरोप प्रा.सूरज दामरे यांनी केला.

ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी पुण्यातील एका एजन्सीला काम देण्यात आलं होतं मात्र त्यांना हे काम करता आलं नाही. शेवटी ऑफलाईन परीक्षा घ्याव्या लागल्या. त्या एजन्सीला पाठीशी कोणत्या कारणामुळं घातलं गेलं असा सवाल करत दामरे यांनी यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं.

ह्या या सर्व प्रकरणाची चौकशी लावण्यात यावी अशी मागणी दामरे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या प्रकरणात कुलगुरु, कुलसचिव ,परीक्षा संचालक, कार्यकारी अभियंता आणि वित्त लेखा अधिकारी यांची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीची योग्य ती दखल घेतली नाही तर विद्यापीठासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ: Corruption in SRTMUN | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोविड लॅब, गाड्यांमध्ये भ्रष्टाचार?

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest NewsABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स'  या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Nashik News : वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
Embed widget