एक्स्प्लोर

Manoj Jarange : 100 एकरवर सभा, 80 एकरवर पार्किंग, 5 लाख लि. पाणी, 600 डॉक्टर्स-नर्स, मनोज जरांगेंच्या सभेसाठी यंत्रणा सज्ज

Manoj Jarange : मनोज जरांगेंची सराटी अंतरवालीमध्ये जी सभा होणार आहे त्याची व्यवस्था कशी असणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई : जालन्यातील (Jalna) सराटी अंतरवलीमध्ये 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या मनोज जरांगेंची (Manoj Jarange) भव्य सभा पार पडणार आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला दिलेली मुदत ही पुढच्या दहा दिवासांमध्ये संपणार आहे. त्याचाच आधी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. तसेच या सभेची सध्या जय्यत तयारी सुरु करण्यात आलीये. तर  100 एकर वरील मैदान हे सभेसाठी सज्ज झालयं. 

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. या 40 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुदत यावेळी देण्यात आली आहे. तर, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या निमित्ताने अंतरवाली सराटी गावात 14 ऑक्टोबरला सभा आयोजित करण्यात आली आहे. पण त्याआधी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा केला. दरम्यान सराटी अंतरवलीमध्ये सभास्थळी कशी व्यवस्था असेल ते सविस्तर जाणून घेऊयात. 

अशी असेल सभास्थळी व्यवस्था

ही सभा 100 एकर ग्राऊंडवर घेण्यात येणार आहे. तर यासाठी 80 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीये. तर या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हे उपस्थित राहणार आहेत. दहा अग्निशमन दलाच्या गाड्या सभेच्या स्थळी उपस्थित असतील. यामध्ये 110 रुग्णवाहिका, त्यात 35 कार्डीयाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच 40 बेडस, 300 डॉक्टर, 300 नर्सिंग स्टाफ असेल.  12000 लिटरचे 50 पाणी टँकर या सभेच्या मैदानात असतील. 5 लाख पाणी बॉटल्स, 1000 लाऊड स्पीकर, 20 LED स्क्रीनची तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे. 

सरसकट मराठा आरक्षणाची मागणी 

दरम्यान सरसकट मराठा आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केलीये. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी उपोषणाची हाक दिली. त्यांच्या या उपोषणाची दखल मुख्यमंत्र्यासंह अनेक मोठ्या राजकिय नेत्यांनी देखील घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेऊन सरकारला 40 दिवसांची मुदत दिली. तिच मुदत आता काही दिवसच उरले आहेत. त्याआधी त्यांच्या सभेतून ते कोणती महत्त्वाची घोषणा का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. 

तसेच आता मनोज जरांगे हे सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर कोणती भूमिका घेणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ओबीसी प्रवर्गातून सरसकट मराठा आरक्षण देण्याची मागणीचा सरकार विचार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 

हेही वाचा : 

भुजबळ म्हणाले 7 कोटी आले कुठून, जरांगे म्हणतात, डिझेलला दोन-एक हजार रुपये देऊ का? मराठा-OBC वाद पेटणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget