Maratha Reservation : मनोज जरांगे यांची चर्चेची तयारी, आरक्षणाचा चेंडू पुन्हा सरकारच्या कोर्टात
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण पुकारलं. त्यानंतर त्यांनी आता सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे.
जालना : 'माझी चर्चेची तयारी आहे पण काय तो एकदाच तुकडा पाडू', असं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. मनोज जरांगे यांचं उपोषण दिवसागणिक अधिक तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळतयं. तसेच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा देखील राज्यात चांगलाच तापलाय. त्यातच त्यांनी गावोगावी साखळी उपोषण सुरु करण्याचा इशारा देखील दिलाय. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता निर्माण झाल्यात.
सरकारला दिलेले अल्टिमेटम दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण सोडले होते. त्यानंतर सरकारला 40 दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण त्यानंतरही आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली. तसेच गावोगावी नेत्यांना आणि पुढाऱ्यांना येण्यास देखील बंदी घालण्यात आली. पण आता मनोज जरांगे यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला थोड्या फार प्रमाणात का होईना दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे.
चर्चेसाठी येणार असेल तर मराठे तुम्हाला आडवणार नाहीत - जरांगे
'काय चर्चा करायची एकदा या. मला आढमूठ पणा करता येत नाही,समाजासाठी मी तयार आहे. पण लवकर या नाहीतर मी आडवा पडल्यावर तुम्ही याल. विमान करुन आलात तरी चालेल असंही त्यात आमचचं डिझेल वापरलं जातं. तुम्ही चर्चेसाठी येणार असाल तर मराठे तुम्हाला अडवणार नाही', असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता राज्य सरकारकडून देखील चर्चेची तयारी दाखवली जाणार का हे पाहणं गरजेचं ठरेल.
उपसमितीची सोमवारची बैठक रद्द करण्याची मागणी
मनोज जरांगे यांनी सोमवारी होणारी उपसमितीची बैठक रद्द करुन त्या दिवशी अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. यावर त्यांनी म्हटलं की, 'आरक्षण देण्यासाठी कोणत्याही पुराव्यांची गरज नाही. तातडीने आरक्षण द्या. उपसमितीची सोमवारची बैठक रद्द करुन त्या दिवशी अधिवेशन घ्या. श्रेय मिळण्याच्या नादात तुम्हा तिघांनाही सगळ्या गोष्टी खूप महागात पडतील.'
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा - जरांगे
दरम्यान सराटी अंतरवलीमध्ये लाठीचार्ज करण्यात आलेले अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केलीये. तसेच दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन अजून का झालं नाही, याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्याव. आजपर्यंत तुम्ही गुन्हे का मागे घेतले नाही, असा सवाल देखील यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा :
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर राज्य सरकारच्या हालचालींना वेग, आरक्षण उपसमितीची सोमवारी बैठक