एक्स्प्लोर

Reservation : कुणबी नोंदींच्या आधारे इतर जातींनीही आरक्षण मागितले तर काय?

Maratha Reservation : सध्या राज्यात कुणबी नोंदींची तपासणी सुरु आहे. त्यातच आता मराठा कुणबींसह इतर जातीतही कुणबी नोंदी आढळून येतायत.

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची शेती करणारा तो कुणबी (Kunbi) ही  मांडणी खरी असल्याचे जुन्या कागदपत्रांच्या नोंदीतून दिसून येत आहे. शेती करणारी जमता म्हणजे कुणबी अशी साधी व्याख्या या समाजाची आहे. मागील काही दिवसांपासून कुणबी मराठ्यांना आरक्षण (Reservation) देण्यासाठी पुरावे तपासले जातायत. कुणबी मराठा असलेलेल्या नोंदींच्या कागदपत्रांची शोधाशोध सध्या सुरु करण्यात आलीये. पण त्यातच आता लिंगायत, साळी, माळी, कोळी, मुस्लिम, धनगर, मारवाडी, यलम यांसारख्या अनेक जातींमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या जातीचे लोकही शेती करतात. पण या जातीतील लोकांना आरक्षण नाही. त्यामुळे कुणबी नोंदींच्या आधारे या जातीतील लोकांनी देखील आरक्षण मागितले तर काय हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. 

मराठा कुणबी यांसारखंच मारवाडी कुणबी, यलम कुणबी, लिंगायत कुणबी या प्रकारे उल्लेख असलेल्या मराठ्यांशिवाय इतर जातीची देखील कागदपत्र देखील सापडतायत. एकट्या लातूर जिल्ह्यात या नोंदी सापडल्यात. काँग्रेस पक्षाचे माजी महापौर विक्रम गोजमगुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. 

 मराठा समाजाच्या 19 हजार कुणबी नोंदी

मनोज जरांगे यांनी मराठा समाज हा शेती करणारा असल्याचं म्हटलं. तसेच शेती करणारा म्हणजेच कुणबी समाज अशी मांडणी देखील त्यांनी केली. त्यानुसार राज्य सरकारकडून सुरु असलेलेल्या कुणबी नोंदींच्या तपासात मराठवाड्यात एकूण 19 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. दरम्यान या नोंदी जुन्याच असल्याचं कागदपत्रांच्या नोंदीतून दिसून आलंय. त्यामुळे आता मराठा समाजाच्या नोंदी तपासल्या जात आहे. पण या नोंदी तपासात असतानाच मारवाडी, लिंगायत, साळी, माळी, कोळी, मुस्लिम, धनगर, यलम यांसारख्या काही जातींच्या नोंदीत देखील कुणबी असल्याचं समोर आलंय. 

'या' लोकांना आधीच आरक्षणाचा लाभ

नव्या कुणबी नोंदी सापडल्यांपैकी  धनगर, माळी, येलम यांना आधीच आरक्षणाचा लाभ मिळ आहे. पण यामध्ये मारवाडी, लिंगायत याही नोंदी सापडल्यात. परंतु या जातींना कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. मनोज जरांगे यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली. त्यानंतर ज्यांना कुणबी नोंदी आहेत, अशा सर्वांना आरक्षणाचा लाभ द्यायला हवा, अशी भूमिका त्यांनी घेतली. 

गुरूवारी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांची संभाजीनगर मध्ये बैठक झाली. या बैठकीमध्येही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मराठासह इतर काही जातीतही त्यांचा व्यवसाय शेती असल्याने कुणबी नोंदी समोर येत आहेत. कागदोपत्री अनेक जातींचा उल्लेखही करण्यात आलाय. मारवाडी किंवा लिंगायत अश्या जात समुहाने कुणबी नोंदी आधारे आरक्षण मागितले तर काय असा प्रश्न विक्रम गोजमगुंडे यांना पडला आहे.  तर याच पार्श्वभूमीवर पुढेही चर्चा होणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता राज्य सरकार या मुद्द्यावर तोडगा कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : मराठा समाजाने ओबीसीऐवजी EWS वर्गातून आरक्षण घ्यावे; प्रवीण गायकवाड यांचे आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget