एक्स्प्लोर

Maratha Reservation : मनोज जरांगे मारुतीचं शेपूट , तो शांत बसणार नाही : छगन भुजबळ

Maratha Reservation : मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे. तो शांत बसणार नाही. गाडी ताब्यात घा, निवडणूका घेऊ नका असं म्हणत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमदार छगन भुजबळ यांनी केला.

Chhagan Bhujbal On Manoj jarange : मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे. तो शांत बसणार नाही. गाडी ताब्यात घा, निवडणूका घेऊ नका असं म्हणत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमदार छगन भुजबळ यांनी केला. मराठा आरक्षणावरुन (maratha reservation) छगन भुजबळ आणि मनोज जरांगे (manoj jarange) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरु आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण (OBC reservation) द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. तर ओबीसींना स्वतंत्र आरक्षण द्या, असे भुजबळांचं म्हणणं आहे. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक फैरी झडत आहेत. आता मुंबईमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे, तो शांत बसणार नाही, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलेय. 

श्रेय वादासाठी उपोषणाला बसलेत - 

मनोज जरांगेना काही कळत नाही. विनाकारण गावबंद करा म्हणताय. वयस्कर लोकांना उपोषणाला बसवताय, त्यांना काही झाले तर काय करायचं? सर्वबाबी सरकार सकारात्मक विचार करताय, परंतु गैरसमज निर्माण करताय.  प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते वाटेल ते बोलतात. 10 तारखेला उपोषणाबाबत समाजातील लोकांना विचारले नव्हते, श्रेय वादासाठी  स्वतः:हुन हे उपोषणाला जाऊ बसले, असा आरोप भुजबळांनी यावेळी केला. 

कोर्टात याला विरोध होणार - 

सरसकट आरक्षण देता येणार नाही, सगेसोयरे हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही . कोर्टात याला विरोध होणार आहे. मराठा मतं जरांगे यांनी भडकवतील. ते आपली मते विरोधात जातील म्हणून सावध भुमिका घेतली जात आहे, असे भुजबळ म्हणाले.   

पोलिसांनी जरांगे यांना कारणीभूत धरावे -

जर वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाले तर पोलिसांनी जरांगे यांना कारणीभूत धरावे. बारावी परीक्षा सुरू आहेत, हे रस्ते बंद करतात. त्यांना जनतेसाठी काही वाटत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे रस्त्यांवर उतरा सांगतात. 10 तारखेला उपोषणाला बसले होते, त्यावेळी कोणताही विचार समाजाला घेऊन जरांगे यांनी केला होता का? सगेसोयरे हा शब्द कायद्यात बसत नाही. एखाद्याचे वडील शेड्युल कास्ट असतील तर प्रमाणपत्र त्यांना मिळेल ?  असे भुजबळ म्हणाले. 

बारसकरांवर काय म्हणाले भुजबळ ?

बारसकर यांची व्हायरल क्लिप मी पाहीली होती, त्यांना धरून विधानसभेत बोललो. ते 2006 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढताय, ते जरांगे सोबत असायचे. त्यांच्या गुप्त बैठक, बेताल वक्तव्ये याला कंटाळून ते बोलत आहेत, असे छनग भुजबळ म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 12 जखमी, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 12 जखमी, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special ReportJalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 12 जखमी, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 12 जखमी, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Embed widget