एक्स्प्लोर
परळीतील मराठा मोर्चाचं ठिय्या आंदोलन स्थगित
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत ठिय्या आंदोलन सरु केले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील हे या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्त्व करत होते.
परळी : मराठा क्रांती मोर्चाचं परळीतील ठिय्या आंदोलन 30 नोब्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गेल्या 21 दिवसांपासून हे ठिय्या आंदोलन सुरु होते. अखेर आज ठिय्या आंदोलन स्थगित करण्याची घोषणा समन्वयक आबा पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत ठिय्या आंदोलन सरु केले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील हे या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्त्व करत होते.
मात्र, परळीतीलच मराठा क्रांती मोर्चाच्या काही सदस्यांचा ठिय्या आंदोलन स्थगित करण्यास विरोध असल्याचेही दिसते आहे.
मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत परळी आंदोलनाचे केंद्र असेल आणि सरकारने इथेच येऊन चर्चा करावी. इतर ठिकाणच्या मराठा कार्यकर्त्यांशी चर्चा करत असेल तर आम्हास ते मान्य होणार नाही. जी चर्चा करावयाची आहे, ती येथूनच होईल, असे स्पष्ट मत परळीत या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मांडण्यात आली होती.
परळीतील ठिय्या आंदोलनाच्या मागण्या कोणत्या होत्या?
- राज्य सरकार करत असलेली मेगाभरती स्थगित करावी. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय भरती करु नये.
- अशा प्रकारचे आश्वासन सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी लेखी द्यावे.
- कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement