मराठा क्रांती मोर्चाचे परळीत पुन्हा रोखठोक आंदोलन
परळीच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुन्हा स्थगित केलेले 21 दिवसाचे आंदोलन आमरण उपोषण स्वरूपात पुन्हा सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे आणि देवराव लुगडे हे आजपासून मराठा बांधवांसह परळी तहसीलसमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत या सर्व मागण्या 15 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. दिलेल्या कालमर्यादेत एकही मागणी पूर्ण न झाल्याने परळीत पुन्हा तहसील कार्यालयासमोर आज 25 नोव्हेंबर पासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. परळीत एवढे दिवस तीव्र आंदोलन करूनही शासनाला जाग आली नाही त्याचे कोणतेही गांभीर्य शासनाला नाही, आज पर्यंत मराठा समाजाच्या जिव्हाळ्याची एकही मागणी शासनाने पूर्ण केलेली नाही. हा राग मनामध्ये घेऊन परळीच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुन्हा स्थगित केलेले 21 दिवसाचे आंदोलन आमरण उपोषण स्वरूपात पुन्हा सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे आणि देवराव लुगडे हे आजपासून मराठा बांधवांसह परळी तहसीलसमोर आमरण उपोषणास बसले आहेत.























