एक्स्प्लोर

सांगोल्यात मनोज जरांगेंचा कोणताही परिणाम होणार नाही, मोठ्या फरकानं शहाजीबापू विजयी होणार, भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा दावा  

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आवाहनाचा कोणताही परिणाम सांगोल्यात होणार नाही असा दावा भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार (Chetan Singh Kedar) यांनी केला आहे.

Sangola Assembly Constituency : सांगोला विधानसभा मतदारसंघात (Sangola Vidhansabha Election) महायुतीचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत. त्यामुळं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आवाहनाचा कोणताही परिणाम सांगोल्यात होणार नाही असा दावा भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार (Chetan Singh Kedar) यांनी केला आहे . आज सांगोला विधानसभेसाठी भाजपची बैठक घेण्यात आली. यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्व 103 गावातून भाजपचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जरांगे पाटील यांनी कितीही उमेदवार उभे करु देत, सांगोल्यात परिणाम होणार नाही

मनोज जरांगे पाटील हे दूषित विचाराने सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. आता ते उमेदवार उभे करायचं म्हणत असतील तर त्यांना 288 मतदारसंघात उमेदवार जरी मिळाली तरी खूप आहे असा टोला केदार यांनी लगावला. जरांगे पाटील यांनी कितीही उमेदवार उभे करु देत त्याचा सांगोल्यात कोणताही परिणाम होणार नसून सांगोल्यात महायुतीचा मोठा विजय होईल असा दावा त्यांनी केला आहे.

दीपक साळुंखे यांच्या जाण्याने कोणताही फरक पडणार नाही

दरम्यान, यावेळी दीपक साळुंखे पाटील यांनी मशाल हाती घेतल्याने काय फरक पडेल यावर ही चर्चा करण्यात आली. दीपक साळुंखे यांच्या जाण्याने कोणताही फरक महायुतीच्या उमेदवाराला पडणार नसून अगदी शे पाचशे मते देखील कमी होणार नाहीत असा दावा केदार यांनी केला. महाविकास आघाडीत देखील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेने बिघाडी झाल्यामुळे महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असे  केदार यांनी सांगितले.

सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

वास्तविक सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनं सांगोल्यात मोठा बिघाड झाला असून आता शेतकरी कामगार पक्षाकडूनही निवडणूक लढवली जाणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या मागे शरद पवार यांची छुपी ताकद राहणार असल्याने याचा फायदा थेट शहाजीबापू पाटील यांना होईल असेही चेतन सिंह केदार यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरेंनी त्यांना सांगोला विधानसबा निवडणूक ळडवण्यासाठी उमेदवारी देण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळं ठाकरेंनी जर दीपक साळुंखे पाटील यांना संधी दिली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण शेकप हा देखील महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळं बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, खासगी कंपन्या आणि चालकांना दिल्या 'या' सूचना
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, खासगी कंपन्या आणि चालकांना दिल्या 'या' सूचना
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Ajit Pawar : पवारांमध्ये मनोमिलन, बदलणार राजकारण?  की भाजपचा डाव, दादांना टार्गेट?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 5 PM : 13 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सFake Drugs Scam :बनावट औषधांची विषारी चेन;वर्ध्यासह काही जिल्ह्यात विशाल एंटरप्राईजेसकडून औषध पुरवठा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, खासगी कंपन्या आणि चालकांना दिल्या 'या' सूचना
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, खासगी कंपन्या आणि चालकांना दिल्या 'या' सूचना
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Embed widget