...अन्यथा मराठ्यांनी पंतप्रधान मोदींचे विमान देखील उतरू दिले नसते; मनोज जरांगे संतापले
Manoj Jarange : मराठा समाजाचे पोरं मोठे होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी षडयंत्र रचले असल्याचे जरांगे म्हणाले आहे.
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कालच्या सभेत मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर काहीच बोलले नाही. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांना सांगण्यात आला नसावा, किंवा सांगून देखील त्यांनी यावर बोलणे टाळले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना गोरगरीबांची गरज नाही. त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल बोलले किंवा नाही बोलले यामुळे मराठ्यांना काहीच फरक पडत नाही. जर मराठ्यांनी विचार केला असता तर पंतप्रधान मोदींचा विमान सुद्धा उतरू दिले नसते, असे जरांगे म्हणाले आहे.
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाच्या कोणत्याही मुद्द्यावर बोलले नाहीत. मोदी यांनी जाणूनबुजून यावर बोलण्याचे टाळले असल्याचे मराठ्यांमध्ये संभ्रम आणि शंका आहे. पंतप्रधान मोदी यांना आता गोरगरिबांची गरज राहिली नसल्याचा अर्थ आता राज्यातील जनता काढत आहे. त्यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाबद्दल बोलायाले हवे होते. एवढा मोठा देशव्यापी आंदोलन सुरु असून, जवळ येऊन देखील मोदी त्याबद्दल काहीच बोलले नाही. त्यांनी या विषयावर बोलले काय आणि नाही बोलले काय याचा मराठ्यांना काहीच फरक पडणार नाही. पंतप्रधान मोदी हे हा विषय हाताळतील यामुळे मराठे शांत होते. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगून हा विषय मार्गी लावण्याच्या सूचना पंतप्रधान देतील अशी अपेक्षा होती. मराठ्यांच्या मनात मोदी यांच्याबद्दल कोणतेही पाप नव्हते, असेही जरांगे म्हणाले.
मराठ्यांना आरक्षण मिळू नयेत म्हणून सरकारचे षडयंत्र...
दरम्यान याचवेळी जरांगे यांनी राज्यातील सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहे. सरकारने आमच्याकडून 30 दिवस मागून घेतले होते. आम्ही मराठ्यांनी यांना 40 दिवसांचा वेळ दिला. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून आरक्षण देणं होणार नव्हते तर त्यांनी आमच्याकडून वेळ मागून घ्यायला नको होते. त्यांनी सांगतानाच 50 वर्षे देता का? असे म्हटले पाहिजे होते. गोरगरीब मराठ्यांचे चांगल होऊ नयेत असे यांना वाटत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे पोरं मोठे होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी षडयंत्र रचले असल्याचे जरांगे म्हणाले आहे.
जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस...
मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. बुधवारपासून जालना येथील आंतरवाली सराटी गावात जरांगे यांचे उपोषण सुरू असून, उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांच्या सांगण्यावरून त्यांनी पाणी घेतले होते. मात्र गेल्या दोन दिवसात त्यांनी पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. विशेष म्हणजे उपचारासाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला देखील त्यांनी परत पाठवले असून, उपचार घेण्यास सुद्धा नकार दिला आहे. त्यामुळे आज सकाळपासून त्यांची प्रकृती खालावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
गावबंदी असतानाही ताफा गावात, खासदार प्रताप पाटलांच्या गाड्यांची तोडफोड; गावात पोलिसांचा बंदोबस्त