Manoj Jarange Sabha : 'शब्द चार अन् मनोज जरांगे आरक्षणावर ठाम'; जरांगेंच्या सभेचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Manoj Jarange Sabha : या सभेतून 24 डिसेंबरनंतर आंदोलनाची दिशा कशी असणार याबाबत मनोज जरांगे खुलासा करणार आहे. त्यामुळे या सभेतकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.
LIVE
Background
Manoj Jarange Sabha : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा सोडवण्यासाठी सरकारने 24 डिसेंबरपर्यंत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे मुदत मागितली होती. सरकारने घेतलेली मुदत उद्या संपत आहे. त्यापूर्वी आज बीड शहरात मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतून 24 डिसेंबरनंतर आंदोलनाची दिशा कशी असणार याबाबत मनोज जरांगे खुलासा करणार आहे. त्यामुळे या सभेतकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात होणार असून, मनोज जरांगे सभेकडे रवाना झाले आहेत.
शहरातील शाळा आज बंद...
मनोज जरांगे यांची आज बीड जिल्ह्यात इशारा सभा होत असून, या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील आज सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमातील सगळ्याच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "बीड शहरातील सर्व शाळा 23 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात यावे. याबाबत दक्षता घ्यावी" असे पत्रात म्हटले आहे.
सभास्थळी रांगोळीतून साकारली छत्रपती शिवाजी महराजांची प्रतिकृती
बीडच्या पाटील मैदानावरती काही वेळात मनोज जरांगे यांच्या इशारा सभेला सुरवात होणार आहे. या सभास्थळी व्यासपीठाच्या समोर भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती रांगोळीतून साकारण्यात आली आहे. यासोबतच मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. बीडमधील अमित गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल आठ तास परिश्रम करून ही प्रतिकृती साकारली आहे.
सभेच्या चार तासांपूर्वी महिला सभास्थळी...
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेला दोन वाजता सुरवात होणार आहे. मात्र, सकाळपासूनच या सभास्थळी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे खेड्यापाड्यातील महिला या सकाळपासूनच सभास्थळी येऊन जागा धरून बसल्या आहेत. यापूर्वी यातील अनेक महिलांना मनोज जरांगे यांच्या सभांना जाता आले नव्हते. त्यामुळे या महिला सकाळीच आपल्या घरून निघाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
सरसकट आरक्षणावर ठाम, सरकारकडे आता उद्याचा दिवस; मनोज जरांगेंचा सभेपूर्वी सरकारला इशारा
इशारा सभास्थळी स्वयंसेवक ड्रेसकोडमध्ये
Manoj Jarange Sabha : मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेला येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या तीन ड्रेसकोडमध्ये स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. सभेच्या ठिकाणी येणाऱ्या समाजबांधव यांना मदतीसाठी हे स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.