एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमचे दोन बळी घेतले, फडणवीससाहेब आता...

Manoj Jarange Patil : जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, या मागणीसाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी ते शिवनेरीवर पोहोचले असून, त्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे आंदोलनासाठी कूच केले आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून, मनोज जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाला सुरूवात होण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

फडणवीससाहेब आरक्षण दिले तर...

मनोज जरांगे पाटील एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सरकार मुद्दाम मराठा विरोधी काम करतंय 

मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, माझ्यासाठी समाज आणि समाजाची लेकरं समाधानी, सुखी करणे ही जबाबदारी आहे. ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडत आहे, असे त्यांनी म्हटले. माझी शिवनेरीवरची ही शेवटची भेट असू शकते असं भावनिक वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले. याबाबत विचारले असता मी माझ्या समाजाच्या पोरं बाळांसाठी लढत आहे. त्यांच्या वेदना खूप अवघड आहेत. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. म्हणून आम्ही  इकडे आंदोलनाला आलेलो आहोत. ते सगळे पाठीमागून बाजू सांभाळत आहेत. वेळ पडली तर त्यांनी देखील गाड्या लावून ठेवल्या आहेत. सर्व धान्य भरून ठेवलेले आहे. ते देखील ताकदीने लढायला तयार आहेत. त्यामुळे आपली भूमिका विजय मिळवून देणे हीच असते. पण, सरकार आडमुठे आहे. मुद्दाम मराठा विरोधी काम करत आहे. पुढचं काही सांगता येत नाही. पण, मी सावध आहे. जिंकणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 

2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

आणखी वाचा 

Radhakrishna Vikhe Patil on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे मुंबईकडे कूच करण्यावर ठाम, सरकारकडून सावध भूमिका; विखे पाटील म्हणाले, आम्ही चर्चेला तयार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget