एक्स्प्लोर

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा; जरांगेंच्या मागे किती समाज यावर दिशा ठरणार

जरांगे पाटील यांची समजूत कशी काढायची यावर खलबतं सुरु असून जरांगे पाटील यांच्या मागे किती मराठा समाज यावर सरकारची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सागर बंगल्यावर येण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चर्चा झाल्याचे समजते. तसेच मनोज जरांगे पाटील यांची समजूत कशी काढायची? यावरही खल करण्यात आला. जरांगे पाटील यांच्या मागे किती मराठा समाज आहे, यावर सरकारची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी

दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अशा प्रकारची वक्तव्ये सरकार म्हणून खपवून घेतली जाणार नाहीत, असेही सांगण्यात आले. दरम्यान, चहापानाच्या कार्यक्रमानंतर आज (25 फेब्रुवारी) थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे.  

जरांगे पाटील राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या सगेसोयरे मसुदा अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या 16 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. आज तेथूनच त्यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत फडणवीसांवर तोफ डागली. तसेच सागर बंगल्याच्या दिशेने येण्याची घोषणा केली. यानंतर त्यांना ग्रामस्थांकडून कडाडून विरोध झाला. मात्र, ते सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

फडणवीस यांच्याकडून षड्यंत्र सुरु

मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसमधून आरक्षण मिळू नये, यासाठी फडणवीस यांच्याकडून षड्यंत्र सुरु आहे. त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. माझा बळी घायचा असेल, तर मी स्वतःच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो. फडणवीस यांना आयुष्यातून उठवून टाकेन, असेही जरांगे म्हणाले. व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांना थांबवण्यासाठी गावकरी आणि आंदोलकांनी विनंती केली. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर राहिले आणि मुंबईच्या दिशेने निघाले. 

मनोज जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न...

मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे यांना भोवळ आल्याने काही अंतरावर थांबले. गावकऱ्यांकडून रुमालने हवा देण्याचा प्रयत्न झाला. तुमची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तुम्ही पायी चालू नका, अशी वनंती गावकऱ्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget