Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने; मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहात दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. याठिकाणी चहापान कार्यक्रम होणार असून विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर बंगल्यावर येण्याची घोषणा केली आहे. ते गेल्या 16 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणास होते. तेथूनच त्यांनी आज भर पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सागर बंगल्याच्या दिशेने येण्याची घोषणा केली. यानंतर त्यांना ग्रामस्थांकडून कडाडून विरोध झाला. मात्र, ते सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नियोजित दौऱ्यासाठी साताऱ्यात होते. त्यांनी सातारा दौरा आटपून तातडीने मुंबई गाठली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. याठिकाणी चहापान कार्यक्रम होणार असून विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेरल्या भूमिकेवर उभय नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कॅबिनेट बैठकीतील विषय
- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित आज राज्यातील पीक पाणी, 2023-24 च्या पुरवणी मागण्या, 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प, 2023-24 पुरवणी विनियोजन विधेयक सादर करणे, 2024-25 लेखानुदान विनियोजन विधेयक सादर करणे यावर चर्चा होणार.
- पीएम यशस्वी या एकछत्री योजने अंतर्गत ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकर मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर योजनांतर्गत 2021 ते 2025-26 या वर्षा करिता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यावर चर्चा होईल.
- राज्यातील अंगणवाडी सेविका कर्मचार्यांच्या 1 एप्रिल 2022 पासून ते त्यांना ग्रॅज्युअटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत सेवा निवृत्ती, राजीनामा, मृत्यू सेवेतून कमी करणे इत्यादी प्रकरणी शासनीमार्फत एकरकमी लाभ देण्याबाबत चर्चा होईल.
- केंद्र पुरस्कृत पीएम ई-बस सेवा या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यावर चर्चा होईल.
- अनूसुचित जमातीच्या व्यक्तींना फौजदारी किंवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणार्या कोर्ट फी मधून सूट देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय हा राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकित होईल.
- भिवंडी कल्याण शिळफाटा, उन्नत मार्गास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे याचे नाव देण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या