एक्स्प्लोर

Manoj Jarange: मनोज जरांगेंची मराठा आरक्षणाचा पश्चिम दौरा, शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आज होणार जाहीर, पश्चिम समन्वयकांसह पूर्वनियोजन बैठक

Manoj Jarange: सरकारने आरक्षणाची मागणी पूर्ण केली नसून यावेळी कडक आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी यापूर्वी दिला होता. २० तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्याची हाक त्यांनी दिली होती.

Jalna News: मराठा आराक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली असून पुढील दौरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणार आहे. यासाठी आज पूर्वनियोजन बैठक अंतरवाली सराटीमध्ये (Antarvali Sarati) बोलावण्यात आली असून 12 वाजता या बैठकीला सुरवात होणार आहे , या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील काही समन्वयक हजेरी लावणार आहेत.

२० तारखेपासून आमरण उपोषणाची घोषणा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दोन महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र, जरांगे यांनी एका महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत निर्णय घेण्यासाठीची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली असून मनोज जरांगेंनी 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.

मराठावाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात कडाडणार मराठा रॅली

मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली घेण्यात आल्यानंतर मराठा आरक्षण शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे. यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पूर्वनियोजन बैठक बोलवली असून अंतरवाली सराटीमध्ये १२ वाजता पश्चिम महाराष्ट्रातील काही समन्वयक हजेरी लावणार आहेत.

रॅलीच्या नियोजनावर आज चर्चा

दरम्यान, सरकारने आरक्षणाची मागणी पूर्ण केली नसून यावेळी कडक आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी यापूर्वी दिला होता. २० तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्याची हाक त्यांनी दिली होती. आता शांतता रॅलीचा पुढचा टप्पा ठरवण्यासाठी पूर्वनियोजन बैठक बोलवण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्रात कुठे कुठे शांतता रॅली होणार? कसे नियोजन असणार यावर पश्चिम महाराष्ट्रातील समन्वयकांसोबत आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे चर्चा करणार आहेत.

मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

एक महिन्याचा वेळ आम्ही सरकारला दिला होता. आता, 20 जुलैला आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे, ते उपोषण कठोर करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटले. तसेच, मराठा समाजाला गोड गोड बोलायचं हा फडणवीस साहेबांचा दुसरा डाव दिसतो. ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांनी. महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवली होती की मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायला लावताय, असे म्हणत जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.  

हेही वाचा:

बार-बार एकच शरद पवार लावलंय; मनोज जरांगे फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांनाही प्रश्न विचारले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget