एक्स्प्लोर

मोठी बातमी! सरकार अन् मनोज जरांगेंमधील बैठक निष्फळ; 'सगेसोयरे' शब्दावर चर्चा थांबली...

Maratha Reservation : आईच्या जातीवरून मुलांची जात ठरत नाही, वडिलांच्या दाखल्यावरूनच मुलांची जात ठरते असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

जालना : सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) दाखल झाले असून, बऱ्याच वेळ चालेल्या चर्चेतून कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे सरकार अन् मनोज जरांगेंमधील बैठक निष्फळ ठरली आहे. "नोंदी असलेल्या सबंधीत नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगेसोयरे यांना हे प्रमाणपत्र मिळावे. रक्ताचे सगेसोयरे हा शब्द आपण गृहीत धरला होता. आमच्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावे,” या मागणीवर जरांगे ठाम आहेत. मात्र, असे करता येणार नाही आणि तसा निर्णय देखील घेता येणार नसल्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले आहे. त्यामुळे आजची बैठक निष्फळ ठरली आहे.   

दरम्यान यावेळी बोलतांना गरीश महाजन म्हणाले की, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला हे आरक्षण द्यायचं आहे.  चर्चेची दारं खुली असली तर मार्ग निघेल. सोयरा शब्दावरून जरांगे आणि आमची वेगवेगळी मतं आहे.  विमल मुंदडा केसचा संदर्भ पाहता मुंदडा मुळच्या एससी होत्या. लग्नानंतर त्या मारवाडी झाल्या. त्यामुळे, ज्यांचे कुणबी दाखले आहेत ते ओबीसी आहेत. त्यांच्या रक्तातल्या नात्यातल्या लोकांना आरक्षण देणं बंधनकारक आहे, असेही महाजन म्हणाले. 

आईच्या जातीवरून मुलांची जात ठरत नाही...

पुढे बोलतांना महाजन म्हणाले की, महिलेवरून तिच्या मुलांची जात ठरत नाही. वडिलांच्या दाखल्यावरूनच मुलांची जात ठरते. न्या. शिंदेंच्या अध्यक्षतेखाली रात्रंदिवस काम सुरू आहे.  शेवटच्या माणसाची नोंद बघेपर्यंत कार्यवाही चालूच राहणार. महिन्या दीड महिन्यात हा प्रश्न निकाली लागणार आहे. आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मराठा आंदोलक मुंबईकडे जाण्याची बातमी आल्याने, काळजी म्हणून पोलिसांनी नोटीसा दिल्या आहेत. पोलिसांनी काळजी घेणे गरजेच आहे. पोलिसांना थोडी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल, असे गिरीश महाजन म्हणाले आहे. 

मुख्यमंत्री शब्द पाळत नाही...

दरम्यान याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा शब्द पाळायला समाज कमी पडला नाही. त्यांचेच शब्द होते, तेच पाळत नाहीयेत. त्यानीच लिहिलेलं आहे, आम्हाला कशाला खोट ठरवतील. घोषणा मोठी झाली, घराला दरवाजा दिला, मात्र कडी कोंडा दिला नाही. 100 टक्के यात मार्ग निघेल. कायद्याच्या चौकटीत जे बसतेय तेच मागत आहोत. पुढील आंदोलनाचे 24 ला बघू, ते सरकारच्या हातात असल्याचं,” जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tractor March : सरकारसह पोलिसांना 'ट्रॅक्टर'ची भीती?; पोलिसांकडून मराठा आंदोलकांना नोटीसा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tarakka : घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
Mumbai Gujarat Merger Row | राज ठाकरे यांचा Mumbai Gujarat विलीनीकरणाचा दावा
Marathi language row | Raj Thackeray चा Nishikant Dubey ला थेट इशारा: मुंबईत डुबवून मारणार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tarakka : घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
Ratnagiri News : दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
High Court Names : शहरांची नावं बदलल्यानंतर देशभरातील विविध हायकोर्टांची नावं का बदलली नाहीत? जाणून घ्या कारण
शहरांची नावं बदलल्यानंतर देशभरातील विविध हायकोर्टांची नावं का बदलली नाहीत? जाणून घ्या कारण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
Embed widget