सोलापुरातील बार्शीत सर्पमित्राला विषारी सापाचा चावा, सर्पमित्र अक्षय घोडके गंभीर
अक्षयवर सध्या डायलसीस उपचार करण्यात येत असून उपचारासह औषधोपचाराचा रोजचा खर्च 25 हजार रुपये आहे. सुरुवातीला अक्षयच्या मित्रांनी रक्कम उभी केली. मात्र आता खर्च अधिक वाढल्याने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

सोलापूर : बार्शीतील लक्ष्मीनगर येथे घरात निघालेला घोणस जातीचा साप पकडताना सर्पमित्र अक्षय घोडके गंभीर जखमी झाला आहे. घोणस अत्यंत विषारी जातीचा साप असल्याने अक्षय रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
बार्शी येथील सुविधा रुग्णालयात अक्षयला दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी सोलापूच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अक्षय हा सामान्य कुटुंबातील असून त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला मदतीचं आवाहन करण्यात येत आहे.
अक्षयवर सध्या डायलसीस उपचार करण्यात येत असून उपचारासह औषधोपचाराचा रोजचा खर्च 25 हजार रुपये आहे. सुरुवातीला अक्षयच्या मित्रांनी रक्कम उभी केली. मात्र आता खर्च अधिक वाढल्याने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. अक्षय 10 वर्षांपासून प्राणीमित्र म्हणून कार्यरत असून आतापर्यंत त्याने अनेक साप, माकड आणि इतर प्राण्यांना जीवदान दिले आहे.
अक्षयला मदतीसाठी बँकेचे तपशील
संदीप नामदेव पवार बँक ऑफ इंडिया बार्शी शाखा खाते क्रमांक : 071418210005727 IFSC कोड : BKID0000714 मोबाईल क्रमांक : 7385983300
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
