लेकीवर बलात्काराच्या धमक्या, उघड्या अंगावर पोलिसांचा नाच अन् हेमंत करकरेंनी दिलेला त्रास; मेजर रमेश उपाध्याय यांनी 17 वर्षात काय काय भोगलं?
Pune:भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आणि त्यांनी त्यांच्या सामाजिक कामाला सुरुवात केली. हेच करत असताना हाय टार्गेटमध्ये त्यांचं नाव आलं आणि मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये त्यांना आरोपी करण्यात आलं.

Malegaon blast case: तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल अखेर समोर आला. हा निकाल या खटल्यात आरोपी राहिलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा होता. 17 वर्षांनी सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यातलेच एक मेजर रमेश उपाध्याय. आयुष्यात घडलेली एखादी घटना खंबीर माणसाला मरण यातना भोगायला लावू शकते, कुटुंबीयांनादेखील त्याचा त्रास होऊ शकतो. जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी उभ्या आयुष्यातले सतरा वर्ष त्रास सहन करावा लागतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मालेगाव बॉम्ब ब्लास्ट.
मेजर रमेश उपाध्याय. याच बॉम्ब ब्लास्टमधील एक आरोपी. भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आणि त्यांनी त्यांच्या सामाजिक कामाला सुरुवात केली. हेच करत असताना हाय टार्गेटमध्ये त्यांचं नाव आलं आणि मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये त्यांना आरोपी करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी जे काही भोगलं ते एबीपी माझाशी बोलताना सांगितलंंय. याच कटू आठवणी सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले.
त्या दिवसाच्या कटू आठवणी सांगताना मेजर रमेश उपाध्याय म्हणाले, ज्या दिवशी ब्लास्ट झाला त्यादिवशी मुंबईत होतो. मात्र हे सगळं प्रकरण सुरू झाल्यानंतर मला मारहाण झाली. शिवीगाळ करण्यात आल्या आणि सतरा वर्षात आमच्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागला. माझ्या मुलीवर बलात्कार करण्याचाही धमक्या आम्हाला आल्या. या संपूर्ण प्रकरणात निर्दोष आहे मी कोणताही गुन्हा केलेला नाही मात्र मी जे केलं त्याला गुन्हाही म्हणत नाही कारण मी देशभक्ती दाखवली आहे.
हेमंत करकरे यांनी मारहाण केली...
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी मालेगाव मध्ये नाही तर मुंबईत होतो. दुसऱ्या दिवशी टीव्हीवरुन मला बातमी कळली. त्यानंतर माझ्या घरी पोलीस आहे. त्यांनी माहिती घेतली. दोन दिवसांनी हेमंत करकरे या पोलीस अधिकाऱ्यांनी मला कस्टडीत घेतलं आणि मारहाण सोबतच पट्ट्याने देखील मारायला सुरुवात केली होती. माझ्या घरच्यांना मला शिवीगाळ गेली. माझे कपडे काढून माझ्या छातीवर नाच करून देखील त्यांनी मला मारहाण केली.
मोहन भागवत, योगी आदित्यनाथ यांची नावं घ्या म्हणाले...
या संपूर्ण घटनेत मालेगाव सोबत माझं काही देणंघेणं नसताना मी ब्लास्ट केला. हे कबूल करण्यासाठी माझ्यासोबत हे सगळं करण्यात येत होतं. मी आयुष्यात कधी मालेगाव मध्ये गेलो नाहीये. मात्र यावेळी एक भयंकर गोष्ट समोर आली. मला मारहाण करुन मोहन भागवत, प्रवीण तोगडिया, श्री श्री रविशंकर, योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्याचा ते मला जबरदस्ती करत होते. मात्र मी शेवटपर्यंत त्यांची नावं घेतली नाही. आमच्यासाठी हे मोठे व्यक्ती होते त्यामुळे त्यांचं नाव घेण्यासाठी आम्ही तयार नव्हतो. यांचं नाव घेतलं नाही तर तुम्ही आम्ही तुम्हाला आरोपी बनवू असं ते कायम सांगत राहायचे. मात्र त्यानंतर दिवाळीच्या दिवशीच मला या सगळ्या केस मध्ये आरोपी करण्यात आलं.
सुशील कुमार शिंदे दिग्विजय सिंग या सगळ्यांनी जाणून बुजून आम्हाला अटक केली...
काही आठवणी सांगताना ते म्हणाले की, माझी तीन वेळा नार्को टेस्ट करण्यात आली. कोर्टाला पहिल्या दिवशीपासून माहिती आहे की मी निर्दोष आहे .ही संपूर्ण केस खोटी होती. सुशील कुमार शिंदे दिग्विजय सिंग या सगळ्यांनी जाणून बुजून आम्हाला अटक केली आणि आमच्यावर हे आरोप केले. आमच्यातील सगळ्यांना सामाजिक आणि आर्थिक या दोन्ही रूपाने आम्हाला बरबाद करण्यात आले. त्यावेळी आमची साथ देणार त्यावेळी कोणीच नव्हतंय. सतरा वर्ष मी आणि आमच्या कुटुंबीयांनी सोसला आहे. आमची कोणती गॅंग नव्हती ना आमची कोणती टोळी होती. मी आर्मी ऑफिसर आहे. माझ्यासाठी सर्वात आधी प्रत्येक माणूस हा भारतीय आहे. त्यामुळे मी का बॉम्ब ब्लास्ट करेन, असं अनेकांना सांगत होतो. मात्र त्यावेळी अनेकांनी आमच्यावर तिकरी नजर होती. त्यावेळच्या सरकारनं आमच्यासोबत वाईट वागणूक केली आणि आमच्याबाबत धुर्तता दाखवली.
मुलीवर बलात्कार करेन अशा धमक्या
माझ्या मुलीवर बलात्कार करेन माझ्या मुलाला दहशतवादी ठरवेल अशा अनेक धमक्या त्यावेळी आम्हाला देण्यात आल्या. मी ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी देखील हा दहशतवादी आहे असं सांगण्यात आलं. एक दिवस तर आमच्या घरात घुसून सगळं सामान बाहेर फेकून दिलं होतं. त्यावेळी काही जण आम्हाला साथ देतील असं वाटत होतं मात्र कोणीही समोर आलं नाही.जे साथ द्यायला समोर येत होते त्यांना धमक्या देत होते, असंही त्यांंनी सांगितलं.
अखेर हेमंत करकरेंनाच दहशतवाद्यांनी संपवलं...
ते म्हणाले की, या सगळ्यात मला हेमंत करकरे यांनी मला प्रचंड त्रास दिला. मला नग्न करुन मारहाण केली होती. मात्र जग गोल असतं, हे मला आता कळलं. 20/11 ला मुंबईत हल्ला झाला होता. त्यावेली महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्याला दहशतवाद्यांना तेव्हा संपवलं होतं. त्यातलेच हेमंत करकरे हे एक होते. त्यावेळी ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांच्यावर वेगवेगळ्या कारभार या वेगवेगळ्या स्तरावर देखील करण्यात आले आहेत. असुरी न्यायव्यवस्था ही वेगळी आहे आणि भारतीय न्यायव्यवस्था ही त्यातूनही वेगळी आहे. जे आमच्या सोबत झालं ते कोणत्याही भारतीय सोबत होऊ नये.























