(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभेत विकास आघाडीचे बहुमत; डाॅ. संजय डी. पाटील यांचा दावा
शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटसह अन्य अधिकार मंडळाच्या निवडणुकीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी व शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या काही सदस्यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत.
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटसह अन्य अधिकार मंडळाच्या निवडणुकीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी व शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या काही सदस्यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. प्राचार्य गट व संस्थाचालक गटात विद्यापीठ विकास आघाडीने वरचष्मा कायम ठेवला आहे. या दोन्ही गटातील सोळापैकी 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान विद्यापीठ विकास आघाडीने विविध अभ्यास मंडळाच्या मिळून 34 उमेदवार व अॅकेडमिक कौन्सिलचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षात शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठ विकास विद्यापीठ विकास आघाडीने योगदान दिले ते लक्षात घेऊन आतापर्यंत विविध गट अभ्यास मंडळात आघाडीचे एकूण 54 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, सिनेटमध्ये विकास आघाडीचे बहुमत बहुमत झाले आहे, असा दावा आघाडी प्रमुख डॉ. संजय डी. पाटील आणि सचिव डॉक्टर व्ही. एम. पाटील यांनी केला.
प्राचार्य गटातील निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यंदाही कायम राहिल्याचे प्राचार्य संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सचिव प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, संस्थाचालक व प्राचार्य गटातील अनुसूचित जमाती गटात प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवारच न मिळाल्याने दोन जागा रिक्त राहिल्या. दरम्यान सुटाचे दोन अधिसभा सदस्य व तीन अभ्यास मंडळावर सुटाचे बहुमत असल्याचे संघटनेचे प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. डी. एन. पाटील यांनी म्हटले आहे.
संस्था चालक गटात 5 विद्या परिषदेत 2 प्राचार्यांमध्ये 8 आणि 28 पैकी 18 अभ्यास मंडळातील 39 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
प्राचार्य गटात एकूण 10 जागा आहेत. शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेचा या निवडणुकीत निर्णायक भूमिका असते. प्राचार्य संघटनेने तीनही जिल्ह्यातील इच्छुक प्राचार्यांशी चर्चा करुन बिनविरोध निवडीचा पायंडा यंदाही कायम राखला. कोल्हापूर जिल्ह्यातून न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही. एम. पाटील, कमला कॉलेजच्या प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील संत गजानन महाराज इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य एस. एच. सावंत यांची बिनविरोध निवड झाली.
सातारा येथील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य बी.एस.सावंत, लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. शेजवळ आणि यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड येथील प्राचार्य एस. बी. केंगार यांची बिनविरोध निवड झाली. सांगली जिल्ह्यात प्राचार्य गटातून कर्मवीर भाउराव पाटील कॉलेजचे प्राचार्य अरुण पाटील, चिखली कॉलेजचे प्राचार्य एस. आर. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सांगली जिल्ह्यातून अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार न मिळाल्याने प्राचार्यांची एक जागा रिक्त राहिली.
संस्थाचालक गटात सहा जागा आहेत. यापैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, सांगली जिल्ह्यातील वैभव पाटील, कराड येथील प्रकाशबापू पाटील आणि सातारा येथील अमित कुलकर्णी यांची निवड झाली आहे. अमित कुलकर्णी हे विकास मंचशी निगडीत आहेत. यापूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी व्यवस्थापन परिषदेवर काम केले आहे. कोल्हापुरातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई यांची संस्थाचालक गटातून सिनेटवर बिनविरोध निवड झाली आहे.
अधिसभेच्या दहा पैकी दोन जागांवर 'सुटा'चे पुरस्कृत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अधिसभेच्या एस. टी. प्रवर्गातून डॉ. शिवाजी बोथीकर (कोल्हापूर) व महिला राखीव संवर्गातून प्रा. शाहीन पटेल (वाघोली) हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
अभ्यास मंडळांमध्ये इतिहास, राज्यशास्त्र व रसायनशास्त्र हया अभ्यासमंडळावर 'सुटा'चे बहूमत आहे. त्या शिवाय 10 अभ्यासमंडळावर उमेदवारी अर्ज कमी असल्याने तिथेही 'सुटा' पुरस्कृत अंदाजे 13 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची औपचारिकता शिल्लक आहे असे 'सुटा'चे प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. डी.एन. पाटील यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या