Majha Maharashtra Majha Vision 2024 : ठाकरेंविना मुंबईत भाजपची सत्ता कशी येणार?, आशिष शेलारांनी थेट आकडेच सांगितले
Majha Maharashtra Majha Vision :आज एबीपी माझाचा 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात आशिष शेलार येत्या काळासाठी महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडत आहेत.
![Majha Maharashtra Majha Vision 2024 : ठाकरेंविना मुंबईत भाजपची सत्ता कशी येणार?, आशिष शेलारांनी थेट आकडेच सांगितले Majha Maharashtra Majha Vision 2024 BJP leader Ashish Shelar On Mumbai Elections Criticism on Uddhav Thackeray Maharashtra Political Updates Lok Sabha Elections Marathi News Majha Maharashtra Majha Vision 2024 : ठाकरेंविना मुंबईत भाजपची सत्ता कशी येणार?, आशिष शेलारांनी थेट आकडेच सांगितले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/04/c836719f54ef41cf0ab2d305707f9c311709535586972737_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Majha Maharashtra Majha Vision: मुंबईत आतापर्यंत शिवसेना-भाजप युतीची (Shiv Sena-BJP Alliance) सत्ता पाहायला मिळाली. मात्र, ठाकरेंविना मुंबईत भाजपची (Mumbai BJP) सत्ता कशी येणार?, या प्रश्नाचे उत्तर देतांना आमदार तथा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी थेट आकडेवारी सांगत राजकीय गणित मांडले आहे. आज एबीपी माझाचा 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात आशिष शेलार येत्या काळासाठी महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडत असतांना त्यांनी शिवसेना-भाजप युतीवर देखील भाष्य केले आहे.
ठाकरेंविना मुंबईत भाजपची सत्ता कशी येणार?
शिवसेना-भाजप युतीवर बोलतांना आशिष शेला म्हणाले की, "प्रत्येक निवडणूक वेगळी असते, ठाकरेविना आम्ही 2014 ला मुंबईत जिंकलो होतो. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत देखील आम्हाला ठाकरेंविना प्रचंड यश मिळाले. किंबहुना आम्हाला यशच ठाकरेंविना मिळाले आहे. 2014 मध्ये आदित्य ठाकरेंच्या आग्रहामुळे आणि आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत युती तोडली. तसेच त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाल वाटले की आम्ही सहज जिंकणार आहोत. मात्र, त्यावेळीचे आकडे काढून पाहा मुंबईत नंबर एकचा आमदार असलेला पक्ष भाजप होता. 2017 सुद्धा आम्ही युतीत सडलो म्हणून भावनिकदृष्ट्या साध घालून विजय मिळवण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला. मात्र, तेव्हा सुद्धा 103 ची शिवसेना 84 वर आली आणि 32 वर असलेला भाजप 82 वर पोहचला. त्यामुळे भाजपने ठाकरेविना निवडणूक लढवली पाहिजे असे मत मुंबईकरांचे असल्याच," आशिष शेलार म्हणाले.
महायुतीचा 45 प्लसचा दावा कसा?
मुंबईत एकूण 6 जागा लोकसभेच्या असून, त्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. राजकारण प्लसचे केले पाहिजे. प्रत्येक निवडणूक वेगळी पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत स्थानिक मुद्दा महत्वाचा असतो. आमच्या पक्षाने केलेल्या कामामुळे, आमच्या सरकराने केलेल्या कामावर अमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांमुळे आम्ही 45 प्लस असा दावा करतोय, असेही शेलार म्हणाले.
राज ठाकरेंना सोबत घेणार का?
राज ठाकरे हे माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत मित्र आहेत. राजकीय जीवनात राज ठाकरे यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजे असे ते व्यक्तिमत्व आहे. त्यांना भेटणं आम्हाला पर्वणी आहे. त्यांना भेटल्यावर युतीचीच चर्चा होते असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. हा त्यांच्यावर देखील आण्यात आहे. तसेच मला वाटत नाही की कोणी माझ्या मित्रावर अन्याय करावा. त्यांचा निर्णय घेण्यासाठी ते मोकळे आहेत. आमचा पक्ष आज तरी युतीच्या चर्चेच्या किंवा निर्णयावर नाही. दोन्ही पक्षातील काही लोकांना वाटत आहे की, आपण एकत्र आल्यास राज्याचं हित होईल, राज्यात चांगल्या जागा निवडून येईल. असे वाटणाऱ्या दोन्ही पक्षातील नेत्यांचं मत आम्ही गांभीर्याने घेत आहोत. मात्र, आज यावर काहीही निर्णय नसल्याचे आशिष शेलार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)