(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झालेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?
राज्यचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हं सध्या स्पष्ट दिसत आहेत. पण, असं नेमकं का आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्यामागचं नेमकं कारण काय आहे याचीच सध्या चर्चा सुरु आहे.
जळगाव : राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. त्यामागची कारणंही तशीच आहेत. भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
या प्रकरणाची सुरुवात जळगाव शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्थेपासून झाल्याच पाहायला मिळत आहे. या संदर्भात फिर्यादी अॅड. विजय पाटील यांनी म्हटलं आहे की संस्थेवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी गिरीश महाजन यांनी मराठा संस्थेच्या संचालकांनी राजीनामे राजीनामे आपल्या समर्थकांकडे सुपूर्द करावे असा आग्रह धरला होता. यासाठी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. विजय पाटील यांना संस्थेचे कागद पत्र असलेले दप्तर घेऊन चर्चे साठी पुण्यात एका हॉटेल मध्ये भेटी साठी बोलविले होते या ठिकाणी प्रत्यक्ष गिरीश महाजन हे उपस्थित नसले तरी त्यांचे जवळचे समर्थक रामेश्वर नाईक, सुनील झंवर यांच्या सह काही कार्यकर्ते उपस्थित हो. त्यांनी अॅड. विजय पाटील यांना संस्था गिरीश महाजन यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यात हवी आहे अशी भूमिका सांगितली होती. किंबहुना त्यांनी त्यासाठी काही रक्कमही देऊ केली होती मात्र विजय पाटील आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यानं हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. यावेळी व्हिडीओ कॉल द्वारे गिरीश महाजनही विजय पाटील यांच्याशी बोलले होते.
गलिच्छ राजकारणाचा सूत्रधार जळगाव जिल्ह्यातील एक बडा नेता : गिरीश महाजन
असं असलं तरीही, मात्र तरीही विजय पाटील यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार काम करण्याची तयारी दर्शवली नाही म्हणूंन रामेश्वर नाईक, सुनील झंवर यांट्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी चाकूचा धाक दाखवत धमकवल्याची तक्रार विजय पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने खंडणी, चोरीचा कट रचणे, सामूहिक इराद्याने गुन्हेगारी करणे असे कलम लावत गिरीश महाजन यांच्या सह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील असल्यामुळं हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेसंदर्भात फिर्यादी अॅड. विजय पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
8 डिसेंबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरीही त्याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. किंबहुना खुद्द गिरीश महाजन यांना सुद्धा या गुन्ह्याची माहिती गुरुवारीच मिळाल्याचं त्यांनी म्हटलं जात असून, कोणता गुन्हा आपल्या विरोधात आहे याची माहितीही पोलिसांनी आपल्या दिली नसल्याचं त्यांनी म्हटल्याचं कळत आहे.