एक्स्प्लोर

राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नाही, आम्ही एकला चलो च्या भूमिकेत, रायगडमध्ये महायुतीत ठिणगी

रायगड जिल्ह्यातील रोहा येथील एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Mahendra Dalvi on  Sunil Tatkare : रायगड जिल्ह्यातील रोहा येथील एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तटकरेंच्या संपूर्ण राजकीय कुरघोड्या काढत त्यांनी टीका केली. तटकरे हे रायगड व महाराष्ट्राला फसवणारे नेते असून, त्यांचं कामच फसवणूक करणं आहे असा घणाघाती आरोप दळवींनी तटकरेंवर केला.

सुनील तटकरे सारख्या नालायकांबरोबर असा उल्लेख करत त्यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आम्ही कधीही युती करणार नाही. आम्ही ‘एकला चलो’ या भूमिकेत आहोत, असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. तसेच मंत्री भरत गोगावले यांच्या आईच्या नावावर राजकारण करून अवमान करणं हे तटकरेंना शोभत नाही. रायगडकर हे कधीही सहन करणार नाहीत, असा इशाराही महेंद्र दळवींनी खासदार सुनील तटकरे यांना दिला. संपूर्ण भाषणातून दळवींनी तटकरेंवर आगपाखड केली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच महेंद्र दळवी यांनी सुनिल तटकरे यांच्यावर टीका केली होती. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून वरिष्ठांचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र महायुतीतच राहुन कोणी  वेगवेगळे प्रयोग केले तर त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी करु असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यासह भाजपला नाव न घेता दिला होता. त्यामुळं रायगड जिल्ह्यात महायुतीतील संघर्ष अजूनही  कायमच आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतच रस्सीखेच आणि चढाओढ सुरू झाल्याचे पाहायला मिळते. शिंदे शिवसेनेच्या अलिबाग मुरुड मतदार संघाच्या  कार्यकारिणी सदस्यांची  बैठकीच  आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सर्व काही ठिक नसल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार हे सातत्याने ऐकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कोण पालकमंत्री होणार याची चर्चा सुरु आहे. सुरुवातील आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिले होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केल्यामुळं पुन्हा रायगडचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. या मुद्यावरुन देखील शिवसेना शिंदे गटाचे आमदार तटकरेंवर टीका करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

महायुतीत वेगवेगळे प्रयोग केले तर ना घर का ना घाट का अशी अवस्था करु, शिवसेना आमदाराचा तटकरेंसह भाजपला इशारा 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
Embed widget