एक्स्प्लोर
महायुतीचंच सरकार येणार, उद्या राज्यपालांची भेट घेणार : सुधीर मुनगंटीवार
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक दुपारी बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. राज्यातील निवडणुकांवरही बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवरही चर्चा करण्यात आली. 31 डिसेंबरपर्यंत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

मुंबई : आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. गोड बातमी कधीही येऊ शकते, त्यामुळे सरकार आमचंच येणार', अशी प्रतिक्रिया देत सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून उद्या (7 नोव्हेंबर) चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. अवकाळी पावसाच्या नुकसानाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी समोरासमोर बसून चर्चा केली. या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. भाजपनं चर्चेसाठी दिलेल्या आमंत्रणावर शिवसेनेनं अजून सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तरी नाराजी दूर करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला आहे.
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक दुपारी बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. राज्यातील निवडणुकांवरही बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवरही चर्चा करण्यात आली. 31 डिसेंबरपर्यंत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
Sudhir Mungantiwar PC | गोड बातमी कधीही येऊ शकते : सुधीर मुनगंटीवार | मुंबई | ABP Majha
संजय राऊत यांचा पलटवार
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याची गोड बातमी मुनगंटीवारच देतील अशा शब्दात राऊतांनी मुनगंटीवारांना टोला हाणला आहे. तसेच भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याचंही राऊत म्हणाले.
उद्या नितीन गडकरी आणि डॉ मोहन भागवत दोघांची भेट निश्चित
नागपूरात संघाचे स्वयंसेवक असलेल्या विलास फडणवीस यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त नितीन गडकरी आणि डाॅ. मोहन भागवत एका कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
