एक्स्प्लोर
महाविकास आघाडीचं खातेवाटप ठरलं; संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील संभाव्य खातेवाटपाची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. संभाव्य खातेवाटपात कुणाला कोणती खुर्ची मिळणार...
![महाविकास आघाडीचं खातेवाटप ठरलं; संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती Mahavikas aaghadi Ministry distribution will declare today Possible list of Ministry distribution महाविकास आघाडीचं खातेवाटप ठरलं; संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/20134339/mahavikas-aghadi-final.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तापेच सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महूर्त सापडला. महाविकास आघाडीतील 26 आमदारांनी कॅबिनेट तर 10 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, अद्याप खातेवाटप झालेला नाही. अशातच ठाकरे सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिनही पक्षांच्या नेत्यांमध्ये धुसपूस सुरू झाल्याचे पाहायला मिळते. सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यानंतर आता तिनही पक्षांच्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खातेवाटप होईल अशी माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
काल दिवसभरात पार पडलेल्या तीन बैठका आणि तब्बल चार तासांच्या खलबतानंतर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप आज होणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस नेते प्रमुख खात्यांसाठी आग्रही आहेत. त्यावरुन मागणी योग्य असली तरी तुटेपर्यंत ताणू नये, असा सूचना वजा सल्लाच अजित पवारांनी काँग्रेसला दिला आहे. उद्यापर्यंत सगळं खातेवाटप अगदी पालकमंत्री पदांसहीत जाहीर होण्याची शक्यता आहे असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच कोणत्याही कुरबुरी, तक्रार, वाद आमच्यात नाही. कोणत्याही तथ्यहीन आणि आधार नसलेल्या चर्चांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच खातेवाटपाची यादी तयार आहे, उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप होईल असा दावा अजितदादांनी केलाय. खाते वाटपात कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचा पुनरुच्चार जयंत पाटील यांनी केलाय.
पाहा व्हिडीओ : खातेवाटप उद्या जाहीर होण्याची शक्यता : अजित पवार
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील संभाव्य खातेवाटपाची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. संभाव्य खातेवाटपात कुणाला कोणती खुर्ची मिळणार पाहूयात...
संभाव्य खातेवाटप राष्ट्रवादी
- अनिल देशमुख - गृह खातं
- अजित पवार - अर्थ आणि नियोजन
- जंयत पाटील - जलसंपदा
- दिलीप वळसे पाटील - कौशल्य विकास आणि कामगार
- जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
- नवाब मलिक - अल्पसंख्याक
- हसन मुश्रीफ - सहकार
- धनंजय मुंडे - सामाजिक न्याय
- बाळासाहेब थोरात- महसूल खात
- अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
- एकनाथ शिंदे - नगरविकास / सार्वजनिक बांधकाम
- सुभाष देसाई - उद्योग आणि खनिकर्म
- अनिल परब - सीएमओ
- आदित्य ठाकरे - पर्यावरण / उच्च व तंत्रशिक्षण
- उदय सामंत - परिवहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)