एक्स्प्लोर

अधिकाऱ्यांनो सावधान, सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर गाठ माझ्याशी, बच्चू कडूंचा इशारा

हल्ली सर्व सरकारी कार्यालयात शासकीय कामात अडथळा आणल्यास काय कारवाई होते. याविषयीच्या कलमांची माहिती देणाऱ्या बातम्यांची कात्रणे एनलार्ज झेरॉक्स करुन लावलेली असतात, पण सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत शासकीय कार्यालयात काहीच तपशील नसतो, असा सूर या कारवाईनंतर नागरिकांमधून उठत आहे.

अमरावती : सरकारी कामात अडथळा आणला तर कलम 353 नुसार सर्वसामान्य नागरिकावर कारवाई होते, मग कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही सेवा हमी कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसीलमध्ये दोन अधिकाऱ्यांना कामात हलगर्जीपणा केल्यामुळे आज बच्चू कडू यांनी निलंबित केलं. या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी आज जिल्ह्यात आलो त्यावेळी दर्यापूर तहसील कार्यालयात अचानक भेट दिली. यावेळी तिथं पवार नावाचे एक वृद्ध शेतकरी माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की अंत्योदयमध्ये कार्ड मिळावं यासाठी ते प्रयत्न करत होते. यानंतर मी तहसीलदारांकडे याबाबत चौकशी केली. त्यांची कागदपत्रं आणि फाईल पहिली तर त्यावर एक वर्षांपासून काहीच कार्यवाही केली नव्हती. ते म्हणाले की, सेवा हमी कायदा सांगतो की सात दिवसांच्या आत कार्यवाही व्हावी, फाईलवर कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होते. मी आज त्या अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे आदेश दिले आहेत, असे बच्चू कडू यांनी सांगितलं. बच्चू कडू म्हणाले की, मी या कारवाईच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगत आहे की सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर तुमचा सामना बच्चू कडूशी आहे. सेवा हमी कायद्याचे पालन झालं नाही तर तुमच्यावर कारवाई होणार. जसं 353 कायद्याअंतर्गत आमच्यावर कारवाई होते तसं सेवा हमी कायद्याचा वापर ताकतीने झाल्याशिवाय राहणार नाही, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. हल्ली सर्व सरकारी कार्यालयात शासकीय कामात अडथळा आणल्यास काय कारवाई होते. याविषयीच्या कलमांची माहिती देणाऱ्या बातम्यांची कात्रणे एनलार्ज झेरॉक्स करुन लावलेली असतात, पण सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत शासकीय कार्यालयात काहीच तपशील नसतो, असा सूर या कारवाईनंतर नागरिकांमधून उठत आहे. राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या बच्चू कडू यांनी मंत्री झाल्यानंतर आपल्या पहिल्याच दौऱ्यात अधिकाऱ्यांना दणका दिला. बच्चू कडू यांनी दर्यापूर तहसील कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दर्यापूर येथील दोन नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि नागरिकांना राशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा) प्रमोद काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांनी आपल्यासह प्रहारच्या दोघा आमदारांचा पाठिंबा शिवसेनेला जाहीर केला होता. यानंतर त्यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रीपद देण्यात आलं. अजून त्यांना कुठल्याही खात्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. मात्र मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी दर्यापूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि नागरिकांना राशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा) प्रमोद काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तालुक्यासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी ते आमदार असताना देखील प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्यातील वादाचे किस्से गाजले आहेत. मंत्रालयात देखील कक्ष अधिकाऱ्याला कानाखाली वाजवल्याप्रकरणी ते अडचणीत देखील आले होते. तर तुरीचा थकीत चुकारा न दिल्यामुळे बच्चू कडू यांनी अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याला तीन तास कार्यालयात कोंडलं होतं. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत रक्कम देण्याचं आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्याची सुटका केली होती. तसेच त्यांना नाशिकमध्ये देखील सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत जोरदार गोंधळ घातला होता. अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्या कारणाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांना घेराव घातला होता. त्यावेळी बाचाबाची झाल्यानं बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच थेट हात उगारला होता. संबंधित बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: 'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
Maharashtra Weather Updates: चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget