एक्स्प्लोर

खातेवाटप निश्चित, उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होणार : अजित पवार

मंत्रालयातील खातेवाटपावर चार तास झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतीही कुरबुरी नाही. मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कुणाला कुठलं खातं द्यायचं हे निश्चित झालं आहे. तसंच अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असणार आहे.

मुंबई : दिवसभरात तीन बैठका आणि तब्बल चार तासांच्या खलबतानंतर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप उद्या होणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस नेते प्रमुख खात्यांसाठी आग्रही आहेत. त्यावरुन मागणी योग्य असली तरी तुटेपर्यंत ताणू नये, असा सूचनावजा सल्लाच अजित पवारांनी काँग्रेसला दिला आहे. खातेवाटपाची यादी तयार आहे, उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप होईल असा दावा अजित पवार यांनी केला आहे. मंत्रालयातील खातेवाटपावर चार तास झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतीही कुरबुरी नाही. मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कुणाला कुठलं खातं द्यायचं हे निश्चित झालं आहे. तसंच अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असणार आहे. Ajit Pawar | खातेवाटप उद्या जाहीर होण्याची शक्यता : अजित पवार | ABP Majha राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं याची यादी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला कोणतं खात द्याच याचा अंतीम निर्णय शरद पवार यांचा आहे. खातेवाटपावर तिन्ही पक्ष समाधानी आहेत का? यावर अजित पवार म्हणाले, ' हे बघा माझं असं मत आहे की तुटेपर्यंत कधीच काही ताणायचं नसतं. मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो मान्य झाला पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपल्या परिने मागणी करण्याचं काम केलं आहे. आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.' आमच्यात कोणत्याही कुरबुरी, हेवेदावे नाहीत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पालकमंत्रीपद कुणाला कोणतं द्यायचं यावरही चर्चा झाली. सध्या 43 मंत्री आहेत, त्यांच्याबाबतही चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत. उद्यापर्यंत सगळं खातेवाटप अगदी पालकमंत्री पदांसहीत जाहीर होण्याची शक्यता आहे असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच कोणत्याही कुरबुरी, तक्रार, वाद आमच्यात नाही. कोणत्याही तथ्यहीन आणि आधार नसलेल्या चर्चांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News :  SIR च्या कामात हलगर्जीपणा अन् टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेतील लिपिकविरोधात गुन्हा दाखल
SIR च्या कामात हलगर्जीपणा अन् टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेतील लिपिकविरोधात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार! पंचगंगेची पातळी 22 फुटांवर, मुसळधार पावसाने राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर
कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार! पंचगंगेची पातळी 22 फुटांवर, मुसळधार पावसाने राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget