Weather Update : आज राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता, विदर्भासाठी 'ऑरेंज अलर्ट', नागरिकांना सतर्केतेच्या सुचना
Weather Update : आज विदर्भातील 'या' जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
Weather Update : गेले काही दिवस महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) देशात हवामानातील बदल पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने (IMD) नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांत देशाच्या अनेक भागांत किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत असून विदर्भात आज ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नागपूर वेधशाळेने ही माहिती दिली असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आज विदर्भासाठी 'ऑरेंज अलर्ट'!
नागपूर वेधशाळेच्या माहितीनुसार आज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीया अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. वीज गर्जना होत असताना नागरिकांनी शक्यतो घरातच राहण्याचे आवाहन वेधशाळेकडून करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करण्यात आली असून, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे तसेच स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.
मराठवाड्यातही तुरळक पावसाची शक्यता
राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून पहाटे थंडी तर दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत, अशात आता विदर्भातसह मराठवाड्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गडगडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलीय. मराठवाड्यात विशेषतः जालना हिंगोली परभणी आणि नांदेड या 4 जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता असल्याचं खुळे म्हणाले. तर आज आणि उद्या खान्देश भागातील नाशिक नगर जळगांव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी
राज्यासह देशातील हवामान पाहता, 26 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. , 25 फेब्रुवारी ते 1 मार्च यादरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि वेगळ्या हलक्या पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे.
हेही वाचा>>>