Rain Update: मुंबईकरांनो सावधान! आज मुसळधार पावसाची शक्यता, राज्याच्या 'या' भागांसाठीही हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट
Weather Update : पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
Maharashtra Rain Update: राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain Update) शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसर पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. सोमवारी मुंबईत (Mumbai) वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, मुंबईप्रमाणेच पालघर (Palghar), ठाणे (Thane) या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे, सोमवारनंतर ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे तसेच त्याच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
मुंबईकर उकाड्याने हैराण, पावसाने मिळणार दिलासा!
राज्यात सोमवारपासूनच मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वातावरणात वाढलेली आर्द्रता तसेच मुंबईत पावसाचे प्रमाण कमी असल्याने मुंबईकर आधीच उकाड्याने हैराण झालेत. मागील दोन दिवस कमाल तापमानातही वाढ झालीय, मात्र आता पुढील आठवड्यात अपेक्षित पावसानंतर तापमानात काही अंशी घसरण होण्याची तसेच उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे
मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तसेच विजांच्या कडकडाटासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईसह 'या' ठिकाणीही मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले आहे.
खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील 4-5 दिवसात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. कालची स्थिती पाहता मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला होता. त्याचबरोबर विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain Update : परभणी अन् लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग