पुढील 48 तास महत्त्वाचे! कोकणात उष्णतेची लाट, विदर्भात अवकाळी पावसाचं संकट
Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्रावर अजूनही अवकाळी पावसाचे ढग कायम आहेत. आज आणि उद्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तासात राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर याउलट काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 37°C आणि 27°C च्या आसपास असेल. मुंबई, ठाणे, पालघर या भागासाठी पुढील 48 तास फार महत्त्वाचे आहेत. या भागातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा 30 -40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे I
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 28, 2024
कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे I
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया pic.twitter.com/k45ImuGMU0
उन्हाच्या झळीपासून दिलासा
मध्य भारतातील अनेक भागांना उकाड्याची झळ बसल्यानंतर, या आठवड्याच्या सुरुवातीस ताज्या मेघगर्जनेच्या पावसाच्या सरींनी अनेक भागात काहीसा दिलासा दिला आहे. पुढील काही दिवसांत अनेक मध्य भारतातील राज्यांमध्ये आणखी पावसाचा अंदाज असल्याने हवामानात काहीसा गारवा पाहायला मिळेल. मात्र, किनारी भागात उन्हाचा चटका बसताना पाहायला मिळणार आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 27, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/nS3k2iOj3y
हवामानात मोठा बदल
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. दक्षिण भारताजवळ आपले हात पसरले आहेत. या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.