Maharashtra Rain Update : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदियात रात्रीपासून दमदार पावसाची हजेरी
Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी
राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाची हजेरी
साक्री तालुक्यातील पिंपळनेर सह परिसरामध्ये वरून राजाने पाठ फिरवली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून पिंपळनेर सह परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून यामुळे या भागातील धरण क्षेत्रात पाणी वाढले असून साक्री तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे....
जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने विविध जलप्रकल्पांमधील जलसाठा घटला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे मात्र पश्चिम पट्ट्यात पाऊस होऊ लागला असून यामुळे लाटीपाडा धरण सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला आहे, गेल्या वर्षी 12 जुलै रोजी लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते मात्र यंदा तब्बल 20 ते 22 दिवस उशिरा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून लाटीपाडा धरण ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे....
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 77.96 टक्के पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये मिळून सद्यस्थितीत एकूण 77.96 टक्के पाणीसाठा
आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गोंदियात रात्रीपासून दमदार पावसाची हजेरी
Gondia Rain : आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्याला काल ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र काल दिवसभर ढगाळ वातावरण होते, त्यानंतर काल रात्रीपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी देखील पावसाचा जोर कायम आहे. तर या दमदार पावसाने खोळंबलेल्या धान रोवनीच्या कामांना वेग येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील हरणबारी धरण ओव्हर फ्लो
नाशिकच्या कळवण, सटाणा ,मालेगाव व देवळा परिसरात अत्यल्प पावसामुळे शेतकरी चिंतेत असताना बागलाणच्या मोसम खोऱ्याला वरदान ठरलेल्या हरणबारी धरण ' ओव्हर फ्लो ' झाले आहे..धरण भरल्याने मोसम खोऱ्यातील शेतकरी आनंदला असून धरणातून मोसम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे..मोसम नदी दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरात समाधान पसरले आहे.यंदा हरणबारी धरण ओव्हरफ्लो होण्यास एक महिन्यापेक्षा जास्त दिवस विलंब झाला आहे.मागील वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच धरण भरले होते.
गेल्या 24 तासात पालघर जिल्ह्यात 123.81 मिमी पावसाची नोंद
पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय आकडेवारी दिनांक 30/07/2023 (Yesterday 8am to today 8 am)
1)वसई:- 17 मी मी
2)जव्हार:- 17.66 मी मी
3) विक्रमगड:- 29 मी मी
4) मोखाडा:- 21 मी मी
5) वाडा :- 14.25 मी मी
6)डहाणू :- 11.6 मी मी
7) पालघर:- 10.3 मी मी
8) तलासरी :- 3 मी मी
एकूण पाऊस :- 123.81 मी मी
एकुण सरासरी :- 15.4 मी मी