Weather : रब्बी पिकांना वरदान मिळणार का? कार्तिक एकादशी ते पौर्णिमा कसं असेल राज्यातील वातावरण; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं ढगाळ वातावरण आहे तर कुठं थंडीचा कडाका आहे.
![Weather : रब्बी पिकांना वरदान मिळणार का? कार्तिक एकादशी ते पौर्णिमा कसं असेल राज्यातील वातावरण; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर Maharashtra Weather News What will be the weather conditions in the state rain news farmers Weather : रब्बी पिकांना वरदान मिळणार का? कार्तिक एकादशी ते पौर्णिमा कसं असेल राज्यातील वातावरण; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/082f7c922aa46c2a855be8d3cdb9073f170046952914577_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं ढगाळ वातावरण आहे तर कुठं थंडीचा कडाका आहे. सध्या राज्यातील बळीराजा मात्र चिंतेत आहे. कारण पाण्याअभावी रब्बी पिकं (Rabi Crop) माना टाकू लागली आहेत. कार्तिक एकादशी ते कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा म्हणजे 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता जाणवत असल्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली.
'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता जाणवत आहे. यामध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील. तसेच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे. हा पाऊस रब्बीतील ज्वारी, हरबरा पिकांना वरदान ठरण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचीच शक्यता अधिक जाणवते, त्यामुळं थंडीता कडाका कमी होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
डिसेंबरमध्ये बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता
आजपासून पंधरा दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळं महाराष्ट्राला त्याचा धोका नाही. सध्या एल निनो मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे. शिवाय पावसासाठी पूरक ठरत असतो तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. तसेच एमजेओ सध्या फेज 2 मध्ये असून तो माघारी फिरुन 6 मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं डिसेंबरमधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.
दरवर्षी जशी थंडी असते तशीच थंडी उर्वरित नोव्हेंबर महिन्यात असेल. म्हणजेच थंडी असणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत 14 ते 16 डिग्री दरम्यान किमान तापमान असु शकते. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. खान्देशात थंडीचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदल हा बंगालच्या उपसागरातून 15 डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या आणि तामिळनाडू केरळ राज्य ओलांडून पश्चिमकडे वाहणाऱ्या मजबूत ' पुर्वी वारा झोता ' तून वाहणारा हिवाळी मोसमी वाऱ्यामुळं महाराष्ट्रतही जाणवेल.
महत्त्वाच्या बातम्या:
Weather : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, पावसाची शक्यता किती? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)