Maharashtra Weather : थंडी वाढली, शेकोट्या पेटल्या; परभणीचा पारा 8 अंशावर
Maharashtra Weather : आज परभणी (Parbhani) जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी परभणीत 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Maharashtra Weather : सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather)जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण आहे. आज परभणी (Parbhani) जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी परभणीत 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडं पूर्व विदर्भात (East Vidarbha) देखील गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गोंदिया जिल्हा पुन्हा गारठला आहे.
गोंदिया जिल्हा पुन्हा गारठला
राज्यातील विविध जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याचे चित्र दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर अद्याप कायम आहे. परभणीत सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा कडाका कायम आहे. आज दुसऱ्या दिवशी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कमी झालेला थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तर दुसरीकडे पूर्व विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गोंदिया जिल्हा पुन्हा गारठला आहे. त्यामुळं आता दिवसा देखील थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळं या बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक सायंकाळ होताच लाकडे जाळून शेकोटीचा आसरा घेत असल्याचं चित्र गोंदिया जिल्ह्यात सर्वदूर पाहायला मिळत आहे.
आजपासून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामन तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात ढगाळ वातावरण अथवा पावसाची कोणतीही शक्यता नसल्याची माहिती खुळ यांनी दिली. बं उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्राचा महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील वातावरणावर विशेष परिणाम जाणवणार नाही.
बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम
राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: