एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नेत्यांच्या लेकराबाळांची अन् तीन अपक्षांची 'दिवाळी'! भाजपच्या पहिल्या यादीत 11 नव्या चेहऱ्यांना संधी

घराणेशाहीवरून सातत्याने आरोप होत असतानाच भाजपने पहिल्या यादीत घराणेशाहीमध्येच तिकिट नेत्यांच्या लेकराबाळांना दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यास संधी दिली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपने (BJP First candidate list for Maharashtra Assembly election 2024) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामठीतून प्रदेश भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, बल्लारपूरमधून मंत्री सुधीर मुनगंटीवार, भोकरमधून श्रीजया अशोक चव्हाण, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर कुलाब्यातून तर शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत 11 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 

घराणेशाहीचा आरोप, पण घराणेशाहीमध्येच तिकिटांचे वाटप 

घराणेशाहीवरून सातत्याने आरोप होत असतानाच भाजपने पहिल्या यादीत घराणेशाहीमध्येच तिकिट नेत्यांच्या लेकराबाळांना दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यास संधी दिली आहे. माजी मुख्यमंत्री भाजप खासदार अशोक चव्हाण  यांच्या मुलीला, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा भाऊ, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा, माजी मंत्री बबनराव पाचपूते यांची पत्नी प्रतिभा सातपूते, राज्यपाल हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे अशी घराणेशाहीमध्येच तिकिट दिली गेली आहेत. भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या कुटुंबीयांना महत्त्व दिले आहे. जुन्या आणि अनुभवी नेत्यांवर पक्षाची भिस्त असल्याचे भाजपच्या पहिल्या यादीतून स्पष्ट झाले आहे. 

भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांना संधी  

दरम्यान, चिखली मतदारसंघातून श्वेता विधाधर महाले, भोकरमधून श्रीजया अशोक चव्हाण, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, फुलंबारीमधून अनुराधाताई अतुल चव्हाण, नाशिक पश्चिममधून सीमाताई महेश हिरे, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, बेलापूरमधून मंदा विजय महात्रे, मनिषा चौधरी, मनिषा पवार, नाशिक पश्चिममधून सीमाताई महेश हिरे. गोरेगाव येथील विधा जयप्रकाश ठाकूर, पर्वती येथील माधुरी सतीश मिसाळ, शेवगाव येथील मोनिका राजीव राजळे, श्रीगोंदा येथील प्रतिभा पाचपुते व केज येथील नमिता मुंद्रा यांची नावे आहेत. 

किती मुस्लिम, एससी आणि एसटीला संधी?

भाजपच्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट देण्यात आलेले नाही. मात्र, अनुसूचित जातीच्या चार आणि अनुसूचित जमातीच्या सहा उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.

कोणत्या उमेदवारांना पहिल्यांदा संधी?

  1. प्रतिभा पाचपुते - श्रीगोंदा 
  2. विनोद शेलार - मालाड पश्चिम 
  3. राजेश बकाने - देवळी (गेल्यावेळी अपक्ष) 
  4. श्रीजया चव्हाण - भोकर 
  5. शंकर जगताप - चिंचवड 
  6. विनोद अग्रवाल ( गेल्यावेळी अपक्ष) - गोंदिया 
  7. अनुराधा चव्हाण - फुलंबरी
  8. सुलभा गायकवाड (आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी) - कल्याण पूर्व 
  9. राहुल आवाडे - इचलकरंजी 
  10. अमोल जावळे (हरिभाऊ जावळे यांचे पुत्र)- रावेर
  11. महेश बालदी - उरण 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
Tornadoes Hit America : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Video : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03.00 PM TOP Headlines 03.00 PM 16 March 2025Anandache Paan | बाईच्या मनातलं लिहिणारा पुरूष, लेखक किरण येले यांच्याशी खास गप्पाAnmol Ratna ABP Majha | डिफेन्स करिअर अकादमीचे डॉ. केदार रहाणे महाराष्ट्राचे अनमोल रत्नABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 16 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
Tornadoes Hit America : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Video : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Dattatray Bharne & Nitesh Rane: मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
IPL 2025 Ishan Kishan : काव्या मारनने डाव लावलेला खेळाडू जबरदस्त फॉर्मात, 58 चेंडूत ठोकल्या 137 धावा, आयपीएलपूर्वी हैदराबादसाठी आनंदाची बातमी!
काव्या मारनने डाव लावलेला खेळाडू जबरदस्त फॉर्मात, 58 चेंडूत ठोकल्या 137 धावा, आयपीएलपूर्वी हैदराबादसाठी आनंदाची बातमी!
Ambadas Danve: केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशांतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..
केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशांतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..
मोठी बातमी ! पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जवान ठार
मोठी बातमी ! पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जवान ठार
Embed widget