एक्स्प्लोर

औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे-अबू आझमींमध्ये जुंपली; फडणवीसांनी मध्यस्थी करत प्रकाश आंबेडकरांची केली पाठराखण

Vidhan Sabha Adhiveshan Updates: औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ, नितेश राणे-अबू आझमींमध्ये जुंपली. नेमकं काय घडलं?

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: औरंगजेबाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवरील लक्षवेधी मांडताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि सपा आमदार अबु आझमी (Abu Azmi) यांच्या शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नंबरचा शत्रू होता, त्या औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवले गेले. औरंगजेबावर एवढं प्रेम असेल तर पाठवून द्या त्यांच्याकडे, असं म्हणत नितेश राणे यांनी भर सभागृहात म्हटलं. नितेश राणे यावेळी सातत्यानं समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे पाहून हातवारे करत होते. यावेळी तुम्ही माझ्याकडे बघून तुमचं म्हणणं मांडा, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी नितेश राणेंना केली. 

विधानसभेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, "धर्मवीर संभाजीराजेंविरोधात कटकारस्थान करणाऱ्या औरंगजेबाचं स्टेट्स ठेवून वातावरण खराब केलं जात आहे. पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली आहे. वंदे मातरम म्हणत नाहीत, पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा औरंगजेब माझा बाप आहे, असं सांगणारे काही लोक आहेत. हे गद्दार लोक आहेत. हे मुद्दामबोलत असतात. औरंगजेब तुम्हारा बाप है म्हणतात. राज्यातील अनेक जिल्ह्यात हे सुरू आहे." 

"या लोकांना वंदे मातरम म्हणायचं नाहीये. जिल्ह्याजिल्ह्यात सर तन से जुदा अशा घोषणा द्यायच्या आहेत. त्यांना राज्याचं वातावरण खराब करायचं आहे. या लोकांना शिवरायांच्या महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही. अशा लोकांनी पाकिस्तानात निघून जावं ना. गृहमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. कशाला पाहिजे हे लोक? राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची आम्हाला चिंता आहे. विविध जिल्ह्यात स्टेट्स ठेवणारी ही मुलं आहेत. त्यांचा मास्टरमाइंड कोण? याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमणार का? आपल्या विभागात काही लोक आहेत. हे लोक कारवाई करत नाहीत. त्यांची अंतर्गत चौकशी करणार का?" असा थेट सवाल आमदार नितेश राणे यांनी गृहमंत्र्यांना केले.

औरंगजेब कुणाचा नेता होऊ शकत नाही, मुसलमानाचाही नाही : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस 

नितेश राणे यांनी विचारलेल्या प्रश्नांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "या देशात औरंगजेब हा कुणाचा नेता होऊ शकत नाही. औरंगजेब मुसलमानाचाही नेता होऊ शकत नाही. त्यानं या देशावर आक्रमण केलं होतं. आपल्या देशातील मुसलमान या देशात जन्मलेले आहेत. भारतातील मुसलमान औरंगजेबाचे वंशज नाहीत. तो हिरो होऊ शकत नाही. हिरो फक्त शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात." पुढे बोलताना ते म्हणाले की, "यापूर्वी कधी कोणत्याही मुस्लिम समुदायाकडून औरंगजेबाचं स्टेट्स ठेवणं, त्याचं उदात्तीकरण करणं किंवा फोटो काढून मिरवणूक काढणं असं होत नव्हतं. मग असे अचानक स्टेटस कसे ठेवले जातात? यामागे कुणाचं डिझाईन आहे का? जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे का? जाणीवपूर्वक कुणी डिझायन म्हणून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तरुणांना उचकावत आहे का? याचे काही इनपूट्स आमच्याकडे आहेत. ते सभागृहात सांगत नाही."

"जरी एसआयटी नेमली नसली तरी या प्रकरणावर काही काम एटीएस करत आहे. काही काम आयबी करतंय. आम्हाला माहिती मिळतेय. गरज पडली तर एसआयटीही नेमू. महाराष्ट्रात दंगे होणे, महाराष्ट्रात तणाव राहणं योग्य नाही. राज्यावर त्याचा परिणाम होत असतो, असं सांगतानाच योग्यवेळी कारवाई झाली असती तर घटना टळू शकली असती. काही ठिकाणी जाणीवपूर्वक घटना टाळली नाही. जर कोणत्या पोलिसांची दिरंगाई असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

ज्यानं स्टेटस ठेवलं त्यांच्यावर गुन्हा आणि जे आव्हान देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही : अबू आझमी 

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी बोलताना म्हणाले की, "काही मुस्लीम तरूणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र त्यानंतर डॉ. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले. माथा टेकवला. त्यांनी हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असं आव्हान दिलेलं. या देशात दोन कायदे चालतात का? ज्यानं स्टेटस ठेवलं त्यांच्यावर गुन्हा आणि जे आव्हान देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. 24 तास द्वेष पसरवला जातोय. त्यामुळे ट्रेनमध्ये गोळीबार झालाय. मुस्लीमांना हिंदुमध्ये बदनाम करायचं हे काम भाजप करतंय. संपूर्ण देशात दहशतीचं वातावरण आहे. ट्रेनमध्ये बुरखा घालून, दाढी वाढवून फिरता येत नाही. मेरी कौम चिल्ला रही है, कोई मदत करनेवाला नही है. नथुराम गोडसेचा फोटो लावतात. हे जाणुनबुजून केलं जातंय. देशाचं वातावरण खराब केलं जातंय." 

औरंगजेबाच्या कबरीवर जाणं गुन्हा नाही; देवेंद्र फडणवीसांकडून प्रकाश आंबेडकरांची पाठराखण 

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आहेत. ते जेव्हा ते तिकडे गेले. तेव्हा तुम्ही महिमामंडन करू नका असं मी बोललो होतो. औरंगजेब शासक होता. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हा गुन्हा आहे. त्याठिकाणी माथा टेकवणं गुन्हा नाही. आपण लोकशाहीत निवडून येतो. पण काही गोष्टी राष्ट्रहिताच्या असतात. राष्ट्रहिताबाबत तडजोड करू नये. देशाच्या इतिहासात अनेक मुस्लीम नेते आहेत ज्यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिलय. त्यामुळे मतांच्या लांगुनचालनासाठी चुकीच्या भूमिकेचे समर्थन करू नका. राष्ट्रहिताविरोधात जाणाऱ्या कुठल्याही धर्माचा असेल तर त्याला सोडलं जाणार नाही. जाणीवपूर्वक असं केलं जात असेल तर चालणार नाही."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget