Prakash Ambedkar : सांभाळून बोला, हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तर मानेल; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला
Prakash Ambedkar : सांभाळून बोला हा सल्ला शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला तर मानेल, असं वक्तव्य वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं.
Prakash Ambedkar : सांभाळून बोला हा सल्ला शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला असता तर मानला असता, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडताना शब्द जपून वापरावेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.
Vanchit Bahujan Aaghadi : वंचित बहुजन आघाडी एमआयएम बरोबर युती करणार नाही
आमची युती शिवसेनेशी झाली असल्याचा पुनरुच्चार आज प्रकाश आंबेडकरांनी केला. दरम्यान, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रू नाहीत. पण वंचित बहुजन आघाडी एमआयएम बरोबर युती करणार नसल्याचे आंबेडकरांनी सांगितले. भाजपने मनस्मृती सोडली, तर त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले. हुकूमशाही थांबवणे आणि लोकशाही वाचवणे ही सध्याची गरज आहे. त्यामुळं जे जे लोकशाहीवादी आहेत, अशा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचा उल्लेख प्रकाश आंबेडकरांनी केला.
Sanjay Raut on Prakash Ambedkar : नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी अशी वक्तव्य करणं आम्हाला मान्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपचे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये प्रतिक्रिया दिली होती.
प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेताना जपून शब्द वापरायला हवेत, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीसोबत एकत्र काम करायचे आहे. त्यामुळं भूतकाळातील मतभेद आपल्याला दूर ठेवायला हवेत आणि भक्कम आघाडी उभा राहायला हवी असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
Prakash Ambedkar : काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
'शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्त्व्यानंतर राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रया येत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या: