एक्स्प्लोर

सूर्य कोपला, महाराष्ट्र पुन्हा तापला! तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?

दिवसेंदिवस राज्यात तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा मोठा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. राज्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर गेला आहे.

Maharashtra Temperature News : दिवसेंदिवस राज्यात तापमानाचा (Temperature) पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा मोठा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. राज्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर गेला आहे. अकोल्यातविक्रमी 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक शहरात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. तापमानात वाझ झाल्यामुळं अनेक जिल्ह्यातील शाळांच्या वेळामध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत आहेत. कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद झाली ते पाहुयात.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील तापमान

अकोला - 45

अमरावती - 44.8

चंद्रपूर - 44

गडचिरोली - 44

यवतमाळ - 44

वर्धा - 44.4

नागपूर - 44.4

ब्रह्मपुरी - 44.7

गोंडिया - 44.2

वाशिम - 48.6

बुलढाणा - 48.5

माथेरान - 48.6

जालना - 48.6

बीड - 48.5

उदगीर - 48.4

मालेगाव - 48.6

नाशिक - 48.6

संभाजीनगर - 48.6

धाराशिव - 48.4

सातारा - 48.9

रत्नागिरी - 48.3

नवी मुंबई - 48.2

परभणी - 48

पुणे - 9.9

सांगली - 9.8

मुंबई - 9.6

गोंदिया जिल्ह्याचे तापमान 43.02 अंश सेल्सिअस, कडाक्याच्या उन्हाने गोंदिया जिल्हावासीय हैराण

गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, आज तापमानाने 43.02 अंश सेल्सिअस इतका उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत असून नागरिकांनी आवश्यक काम असल्यावरच घराबाहेर पडावे व उन्हापासून बचाव करण्याकरिता रुमाल, गमजाचा वापर करावा. तसेच भरपूर प्रमाणात शीतपेय ग्रहण करावे असे आवाहन गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 आणि 25 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 आणि 25 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भात 28 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तसेच, कोकण आणि गोव्यात 24 एप्रिल रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांचा वेग 30 ते 50 किमी प्रतितास राहू शकतो, त्यामुळे शेती व झाडांना काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा प्रभाव कायम

महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उकाडा अधिक जाणवेल, असा अंदाज केंद्रीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

शेतकऱ्यांसाठी सूचना

हवामान विभागाने शेतकऱ्यांनाही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, पिकांना सकाळी किंवा संध्याकाळी हलके पाणी द्यावे, जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंगचा वापर करावा. नव्या लागवडीवर सावलीसाठी जाळी (shade net) वापरावे, असे सूचवण्यात आले आहे.  

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget