एक्स्प्लोर

Sanjay Raut : 'कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है', विधानसभेला 200 तर लोकसभेला 40 जागा जिंकू : राऊत 

Sanjay Raut : कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.

Sanjay Raut : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणून आम्ही एकत्र लढलो तर कसब्याचा (Kasba) निकाल लागतो आणि थोड जर इकडं तिकडं झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी दिलेला धडा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तसेच लोकसभेला 40 जागा निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

चिंचवडचा विजय भाजपचा नाही, तो विजय जगताप पॅटर्नचा

चिंचवडमध्ये आमच्याकडून काही बाबतीत चूक झाली. चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे, हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो. हा विजय जगताप पॅटर्नचा असल्याचे संजय राऊत म्हणाले. जर उमेदवार निवडताना अधिकची काळजी आम्ही घेतली असती किंवा राहुल कलाटेंनी माघार घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता असेही राऊत म्हणाले. 

पुणेकर अभिनंदनास पात्र, ते अमिषाला बळी पडले नाहीत

या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचं दर्शन, प्रदर्शन, विकृती पाहायला मिळाली. हे सगळं होऊन सुद्धा कसबा आणि पुण्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांनी जी चपराक दिली, त्यातून त्यांनी धडा घ्यावा. पुणेकर अभिनंदनास पात्र आहेत. ते कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडले नाहीत. घराघरात पैसे देण्याचं काम करण्यात आल्याचे राऊत म्हणाले. जनतेने धनशक्ती लाथाडली. कसबा ही सुरुवात आहे. कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असेही राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. जिथे शक्य आहे तिथे आम्हा महाविकास आघाडी एकत्र लढू असे राऊत म्हणाले. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हा वेगळा विषय आहे. हा विषय लोकसभा आणि विधानसभेचा असल्याचे संजय राऊत म्हणाले.  

40 आमदारांनी आधी स्वत:चं अंतरंग तपासावं

शिंदे गटाच्या आमदारांच्या मागणीप्रमाणे अटक होणार असेल तर होऊन जाऊ द्या अटक. कायदा, न्यायालय, पोलीस अजून खोक्याखाली चिरडले नाहीत. अजूनही रामशास्त्री जिवंत असल्याचे राऊत म्हणाले. या 40 आमदारांनी आधी स्वत:चं अंतरंग तपासावं असा टोलाही राऊतांनी लगावला. मी विधीमंडळाचा पूर्ण आदर करतो. माझं वक्तव्य हे विशिष्ट फुटीर गटापुरतं होतं.  विधीमंडळाचा मी अपमान करणार नाही. कारण मी त्या सभागृहाचा सदस्य असल्याचे राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : 2024 ची तयारी सुरु, देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात : संजय राऊत

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीBJP MLA Driver Death | Pankaj Deshmukh यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीचा मोठा आरोप, सीआयडी चौकशीची मागणीAnjali Damania On Vaishnavi Hagawane वैष्णवीच्या वडिलांनी सुपेकरांना 1 लाख पाठवल्याचं बँक स्टेटमेंटDevendra Fadnavis Speech मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु अहिल्यादेवींचे दर्शनासाठी येतील,फडणवीसांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
India England Tour :  इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या
Embed widget