एक्स्प्लोर

रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत प्रसारमाध्यमांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विचारले होते. यावर गोरे म्हणाले की, आगे आगे देखिए होता है क्या.

Jayakumar Gore : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आज आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) एकच व्यासपीठावर होते. यावेळी चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम सुरु होताच रणजितसिंह मोहिते पाटील हे गोरे सांगून कार्यक्रमात निघून गेल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत गोरे यांना विचारले, यावर गोरे म्हणाले की, आगे आगे देखिए होता है क्या.

आजचा कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता, तो विद्यापीठाचा कार्यक्रम होता. त्याला कोणी यावं याविषयी आम्ही बंधन नाही घालू शकत नाही असे जयकुमार गोरे म्हणाले. मात्र, मी पालकमंत्री झाल्यापासून सोबत कोण कोण दिसत आहे, ते तुम्ही बघताय असेही गोरे म्हणाले. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला कोणाच्या सम्राज्याविषयी बोलायचं नाही. भाजपने मला जी जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडत आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी म्हणून पालकमंत्री पदावर मी काम करत असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. कोणी कानात बोललं, कोण कुठंही बोललं तरी याचा परिणाम अधिकचा होत नाही. आम्हाला आणि जनतेला जे पाहिजे ते आमच्या कानात व्यवस्थित आहे असेही गोरे म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता तर विधानसभेला शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना विजय केल्याचा आक्षेप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यानंतर आमदार मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये 1000 सदस्य नोंदणी करुन त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करुन घेतल्याबद्दल मोहिते पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केल्याचे पत्र दिले होते. या पत्रात भाजपाचे अंत्योदयाचे धोरण जनमानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो असे म्हटले होते.

दरम्यान, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांना देखील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी राम सातपुते यांनी केली होती. तसा ठरावही एका सभेत त्यांनी घेतला होता. मात्र, अद्यापपर्यंत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. 

महत्वाच्या बातम्या:

'तो' प्रश्न विचारताच रणजीतसिंह मोहिते पाटलांनी मान खाली घातली; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं उत्तर

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणी वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणी वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले

व्हिडीओ

Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणी वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणी वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
Embed widget