MI vs GT IPL 2025: गुजरातवर मुंबई भारी

MI vs GT IPL 2025: काल झालेल्या मुंबई विरुद्ध गुजरात सामन्यात मुंबई गुजरातवर भारी ठरली...नाणेफेक जिंकून हार्दिक ने फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला...पण सुरवातीला मिळालेल्या जीवदानानंतर मुंबई च्या फलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरविला. आज मुंबई संघाची सलामीची जोडी बदलली ... ब्रेस्टो आज रोहित बरोबर सलामीला आला...पण पहिलाच सामना खेळणाऱ्या ब्रेस्टो ने सुरवातीपासून आक्रमणाची धुरा स्वतःकडे ठेवून संघाला मजबूत सलामी दिली.
प्रसिद्ध ने टाकलेल्या ४ त्या षटकात त्याने २७ धावा चोपून काढून आज मुंबई संघ मोठी धावसंख्या उभारणार असल्याचे संकेत दिले..साई किशोर याने त्याला बाद करण्यापूर्वी त्याने रोहित सोबत ४४ चेंडूत .८४ धावांची भागीदारी केली. आजचा दिवस गाजवला तो मुंबईचा राजा रोहित शर्मा याने...आपण एलिमिनेटर मध्ये खेळत आहोत याचे भान त्याला होते ..सुरवातीला कोएट्झी आणि नंतर कुशल ने दिलेल्या जीवदानावर त्याने आज मोठी खेळी उभारली....त्याने आज खेळपट्टीवर नांगर तर टाकलाच पण सूर्यकुमार आणि तिलक सोबत महत्वाच्या भागीदारी करून मुंबई संघाला २०० हून अधिक धावांचा टप्पा गाठून दिला...आजच्या त्याच्या खेळीत स्वीप या फटक्याचे विविध पैलू पाहायला मिळाले...पॉवर प्ले चे शेवटचे षटक घेऊन येणाऱ्या साई किशोर याच्या त्या षटकात त्याने वेगवेगळ्या जागी स्वीप मारून चौकार वसूल केले...सुरवातीला मारलेल्या सिराज याला मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह...सचिन यांची आठवण देऊन गेला...अत्यंत शांत डोक्याने केलेली फलंदाजी आणि मोठी खेळी खेळण्याची भूक या दोन्ही गोष्टी त्याच्या आजच्या खेळीत दिसल्या....आज त्याने आय पी एल स्पर्धेत ७००० धावांचा टप्पा गाठला ही किमया करणारा विराट नंतर तो दुसराच...आज नेहमीप्रमाणेच सूर्य कुमार यादव याने उत्तम फलंदाजी केली..तो आणि रोहित जेव्हा खेळत असतात तेव्हा डोळ्यांना आनंद तर मिळतोच पण स्वीप हा फटका किती वेग वेगळ्या प्रकारात खेळला जाऊ शकतो याचे दर्शन होते....आज तिलक याने ११ चेंडूत २५ धावा आणि हार्दिक याने ९ चेंडूत २२ धावा काढून मुंबई संघाची धावसंख्या २२८ इतकी नेली..
२२८ धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरात संघाला सुरवातीलाच शुभमन च्या रूपाने पहिला धक्का बसला. ...पण नंतर पाहायला मिळाले ती "पोएट्री इन मोशन' सुदर्शन याने त्याच्या फलंदाजीतले काव्य दाखविले..काय नव्हते या काव्यात छंद होते...अलंकार होते...नाद होता... इतक्या तंत्रशुद्ध पद्धतीने खेळून साडेसातशे धावा करणारा सुदर्शन हा बहुदा पहिलाच फलंदाज असेल...कोणतीही घाई नाही...चेंडूच्या जवळ जाऊन चेंडू उशीरा खेळणे या मुळे तो देखणा तर वाटतोच पण त्याचा बचाव अभेद्य वाटतो.,..त्याने मारलेला एक कव्हर ड्राईव्ह डोळ्यांना किती आनंद देऊन गेला... फ्रंट फूट वर येऊन गुडघ्यावर बसून त्याने तो कव्हर ड्राईव्ह मारला...२०/२० क्रिकेट मधे असा फटका क्वचित पाहायला मिळतो....त्याने बुमरहा याला अँटीसेपेशन करून मारलेला एक पटकन डीप मिडविकेट पट्ट्यात वेगाने सीमापार गेला... तो इतका सुंदर खेळत होता की कुशल सोबत ६४ आणि सुंदर सोबत ४४ चेंडूत ८४ धावांची भागीदारी करून आज गुजरात संघ ही लढत जिंकणार याचे संकेत दिले...जेव्हा एखादा फलंदाज इतका सुंदर खेळत असतो तेव्हा विरोधी संघ त्याची चूक होण्याची वाट पाहत असते आणि झाले देखील तसेच ग्लेसन च्या गोलंदाजीवर स्कूल करीत असताना तो बाद झाला... खरे तर तो चेंडू फुलटॉस होता सुदर्शन याने तो इतरत्र कुठेही मारला असता... पण सुदर्शन ची तपश्चर्या भंग करणारा तो चेंडू मेनकेच्या रूपात आला..आणि सुदर्शन मोहाला बळी पडला... त्याच षटकात दोन चौकार आले असताना त्याला हा मोह होणे हे अजब होते...
पंच अनिल चौधरी एका फोर्डकास्ट मध्ये असे म्हणाले होते की "वॉशिंग्टन सुंदर हा एक उत्तम फलंदाज असून त्याचे तंत्र अतिशय भक्कम आहे.. आणि भारतीय क्रिकेटमध्ये तो अंडर रेटेड आहे" त्यांचे हे विधान काल सुंदर ने पुन्हा एकदा खरे करून दाखविले..आपल्या सहकारी ने घालून दिलेल्या वाटेवरून तो चालला...आणि एक सुंदर खेळी करून गेला..२४ चेंडूत ४४ धावा ठोकून काढताना त्याने तीन षटकार मारले..त्यातील २ षटकार १३ व्या षटका मध्ये बोल्ट याला मारले... पहिला षटकार स्लोवर आखूड टप्प्याचे चेंडूवर बॅक फुटवर जाऊन पूल केला.. आणि दुसरा वेगाने फ्लिक केला..सुंदर आणि सुदर्शन याची जोडी फोडण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधाराला द्रौपदीच्या थाळीची मदत घ्यावी लागली...आणि बुमरा यांनी जो यॉर्कर टाकला त्याला कोणतेही उत्तर सुंदर कडे नव्हते ....सुदर्शन आणि सुंदर बाद झाल्यावर रुदरफोर्ड याने प्रयत्न केला पण तो पराभव वाचवू शकला नाही...२०१५ पासून मुंबई संघाने प्ले ऑफ मधील १२ पैकी १० सामने जिंकले आहेत...पुढील लढत पंजाब विरुद्ध आहे....आणि श्रेयस चे वाघ जखमी आहेत.
























