एक्स्प्लोर
पुण्यातील सदाशिव पेठेत मोठा अपघात, कारने विद्यार्थ्यांना उडवले, अपघाताचे फोटो समोर
पुण्यातील सदाशिव पेठेत मोठा अपघात झाल्याची घटना घडली, एका भरधाव कारने 12 विद्यार्थ्यांना उडवले आहे.
Pune car accident
1/10

पुण्यातील सदाशिव पेठेत एका चारचाकी गाडीने 12 जणांना उडवल्याची माहिती समोर येत आहे.
2/10

पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत ही अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे.
3/10

भावे हायस्कूलजवळ कारने 12 जणांना उडवल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एमपीएससीचे विद्यार्थी जखमी झाले आहेत.
4/10

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
5/10

अपघात घडताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आता घटनास्थळी दाखल झाले आहेत.
6/10

टपरीवर चहा पिण्यासाठी विद्यार्थी गेले होते. यावेळी एका कारने सर्वांना धडक दिली.
7/10

या अपघातात 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना संचेती आणि मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची माहिती मिळाली नाही
8/10

संध्याकाळची वेळ असल्याने अनेक विद्यार्थी हे भावे हायस्कूलजवळ चहा पिण्यासाठी चहाच्या टपरीवर आले होते. यावेळीच अपघात झाला
9/10

हा अपघात करणाऱ्या कार चालकाचा फोटो आहे. सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार परिसरात आली. या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोठी अपघाताची घटना घडली.
10/10

या गाडीने तब्बल 12 जणांना उडवलं. यामध्ये बहुतेक जखमी हे MPSC चे विद्यार्थी असल्याची माहिती आहे.
Published at : 31 May 2025 09:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















