![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
Coronavirus Updates : कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार शाळा बंद करायच्या की नाही हे स्थानिक प्रशासन ठरवेल असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले.
![राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती Maharashtra School No decision has been taken to close schools in the state says Education Minister Varsha Gaikwad राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/15/2e79aeab9b6281c46b13db4039c23aef_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ओमायक्रॉनची (Omicron) भीती जरी असली तरी राज्यातल्या शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचं शाालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे. ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही माध्यमातून शिक्षण सुरुच राहील, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नवी मुंबईतल्या घणसोलीतल्या शाळेत 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले. त्यामुळे शाळा बंद करण्याचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु होती. मात्र एखाद्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळले तर काय करायचे हे स्थानिक प्रशासन ठरवेल, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या या कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
शाळा सुरू करण्याच्या SOP नुसार, शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार शाळा बंद करायच्या की नाही हे स्थानिक प्रशासन ठरवेल असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले.
मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा अखेरीस 15 डिसेंबरपासून सुरू झाल्या होत्या. मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये फक्त 34 टक्के पालकांनी संमती पत्र दिले होते. राज्यात एक डिसेंबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. विविध महापालिकांनी स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)