(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satara News : दारु विक्रेत्याला महिलांनी दिला चोप, सातारा जिह्यातील चिलेवाडीच्या महिलांचा रुद्रावतार
Satara News : दारु विकणाऱ्या (liquor seller) दुकानदाराला महिलांनी कपडे फाटेपर्यंत चोप दिल्याची घटना घडली.
Satara News : दारु विकणाऱ्या (liquor seller) दुकानदाराला महिलांनी कपडे फाटेपर्यंत चोप दिल्याची घटना घडली. ही घटना सातारा (Satara) जिह्यातील चिलेवाडी इथे घडली. यावेळी महिलांनी दारुच्या बाटल्याही रस्त्यावर आणून फोडल्या आहेत. बेकायदा दारु विक्रेतेच्या दुकानावर महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. आमचे पती दारु पिण्यासाठी जातात असे म्हणत गावातील महिलांनी या दारुच्या दुकानावर हातात दांडकी घेऊन हल्ला केला.
दारु विक्रेता पोलिसांच्या ताब्यात
इतकंच नाही तर महिलांनी दुकानातील दारुच्या बाटल्याही रस्त्यावर आणून फोडल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महिलांनी नंतर दुकानदाराला वाठार पोलिसांच्या ताब्यात दिले. मार खाताना मात्र दुकानदार मला मारु नका मी पुन्हा दारु विकणार नाही असे वारंवार सांगत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दारुच्या बाटल्याही फोडल्या
साताऱ्यातील चिलेवाडी या गावातील महिलांचा रुद्रावतार पहायला मिळाला. गावाच्या टोकावर असलेल्या दुकानात बेकायदा दारु विक्री केली जाते आणि त्याच्यामुळे आमचे पती दारु पिण्यासाठी जातात असे म्हणत गावातील महिलांनी या दारुच्या दुकानावर हातात दांडकी घेऊन हल्ला केला. या हल्यात दुकान दारु विकणाऱ्यास महिलांनी कपडे फाटेपर्यंत मारले. इतकंच नाही तर दुकानातील दारुच्या बाटल्याही रस्त्यावर आणून महिलांनी फोडल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.
अवैद्य दारूच्या विरोधात नंदूरबारमध्ये महिला बचत गट आक्रमक
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वडझाकन गावामध्ये दारूच्या व्यसनामुळं गावातील सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब होत होते. त्यामुळं महिला बचत गट सदस्यांनी गावात असलेले अवैध दारूचे दुकाने तसेच हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत समोर जाळून होळी केली. वडझाकन गावात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून हातभट्टी दारुमुळं गावातील महिला त्रस्त झाल्या होत्या.
वारंवार बचत गट महिला सभांमध्ये तक्रार करत होत्या. पती दारू पिऊन मारहाण करतो. रोजंदारीचे आणलेले पैसे हिसकवून दारू पिऊन घरात धिंगाणा घालतात. शेतात पिकवलेला धान्य विकून दारूचे व्यसन करतात. आता तर काही गावातले तरुण मुलेही मद्यधुंद अवस्थेत फिरत आहेत. दारूमुळे अनेक महिलांचे संसार रस्त्यावर आले आहेत अशी तक्रार लोकनियुक्त सरपंच अनिता वसावे यांच्याकडे महिलांनी केली होती. त्यानंतर सरपंच अनिता वसावे यांनी 26 जानेवारीच्या अनुषंगाने 25 जानेवारी रोजी संध्याकाळी महिला ग्रामसभा घेऊन गावात दारूबंदीचा ठराव केला मात्र गावात दारू विक्री सुरू असल्याने महिला आक्रमक झाल्या असून गावात ज्या ज्या ठिकाणी दारू विक्री चालते त्या ठिकाणी जाऊन महिला आंदोलन करीत असून एकूणच महिलांनी गावातील नऊ ठिकाणी दारू तयार करण्याच्या साहित्य आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या दुकानातील साहित्य ग्रामपंचायत कार्यालय जवळ आणून त्याची होळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: