बंडातात्या कराडकर वादग्रस्त वक्तव्य प्रकरण; चौकशी झाल्यानंतर सातारा पोलिसांनी सोडून दिलं
बंडातात्या कराडकर यांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी चौकशी झाल्यानंतर सातारा पोलिसांनी सोडून दिले आहे.
मुंबई : दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी चौकशीनंतर दुपारी 3 वाजता सोडून दिले. बंडातात्या कराडकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येतोय, राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आज सकाळी सातारा पोलीस बंडातात्या यांच्या फलटणमधील कराडकर यांच्या मठात पोहोचले. यावेळी पोलिसांनी कराडकर यांना मठातून ताब्यात घेतलं. त्यानंतर सातारा पोलीसांनी कराडकर यांची चौकशी करून सोडून दिले .
काय आहे घटनाक्रम?
- सकाळी 7.45 वाजता बंडातात्या कराडकर यांच्या साताऱ्यातील फलटण मधील पिंपरद मठावर फलटण पोलिस ठाण्याची एक गाडी दाखल झाली.
- सुमारे तीन तास बंडातात्या कराडकर आणि पोलिस यांच्यात चर्चा झाली
- बंडातात्या कराडकर यांनी 11 वाजता मठातच जेवण केले
- 11 .5 मिनीटानी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी गाडीत बसण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी स्वत:च्याच गाडीतून मी सातारला येत असल्याचे सांगितले
- 11.40 वाजता बंडातात्या फलटणमध्ये पोहचले
- 12.50 वाजता बंडातात्या कराडकर यांच्या गाड्या वाठारला पोहचल्या त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला पोवईनाका या ठिकाणी एकत्र जमायला सुरवात झाली. आणि पोलिसांची रस्त्यावरच धांदल उडाली
- 12.55 वाजता सातारा शहर पोलिस ठाण्याच्या बाहेर पोलिसांची मोठी कुमक लावून संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला
पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्या गाड्यांचा ताफा वळवला. आणि महामार्गावरुन सातारच्या दिशेला गाड्या न घेऊन जाता पुन्हा पुण्याच्या दिशने घेऊन गेले आणि मोळाचा ओढा मार्गे पोलिसांनी त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्यापर्यंत आणले. - 1.05 वाजता – बंडातात्या कराडकर यांची गाडी सातारा शहर पोलिस ठाणे येताच पोलिसांचा ताफा अचानक गायब करण्यात आला.पोलिसांनी बंडातात्यांना ताब्यात घेतलेच नव्हते असे दाखवण्याचा पोलिसांचा हा प्लॅन होता.
- दुपारी 1.00 वाजता – बंडातात्या कराडकर यांना अटक करणार नसल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांची माहिती
- दुपारी 2.55 वाजता बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी सोडून दिले.
बंडातात्या कराडकर यांचा माफीनामा
नेत्यांच्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी बंडातात्या यांनी माफी मागितली. बंडातात्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येते होती. गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला होता. बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली होती. त्याशिवाय बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात बेकायदेशीर आंदोलनप्रकरणी सातारा शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर?
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे 'दंडवत आणि दंडूका' आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला होता. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या: