एक्स्प्लोर

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद

Sarpanch Murder Case : सरपंच यांच्यावरील घटनांच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने घेतला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. सदर घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत, त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (28 डिसेंबर) बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अशातच या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. 

दरम्यान, बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले, अशा घटनांच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज येत्या 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 3 दिवस बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने घेतला आहे.

सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा? त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी?

महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे आदर्श माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा सरपंचावरील जीवघेण्या हल्याच्या दुसऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड  करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा? त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी? असा सवाल करत अशा घटनावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत. सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा, हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्या मागच्या मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा. सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, अशी सरपंच संघटनेची मागणी आहे. 

बीडमध्ये मुक मोर्चाला लोटला जनसागर

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर रस्त्यावरती उतरला होता. बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर आले, बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मोर्चात नागरिकांची उपस्थिती होती. हातात न्यायाचे फलक घेऊन महिला देखील या मोर्चात सामील झाल्या.  आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये कडकडीत बंद आहे. अख्खं गाव बीड मोर्चामध्ये सहभागी झालं असल्याने गावकरी बीडमध्ये पोहचले आहेत. गावात शुकशुकाट असल्याचे काल बघायला मिळाले आहे. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
IND vs AUS : विराट कोहली ॲडिलेडचा किंग, दमदार रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, दुसऱ्या वनडेत टीम इंडिया कमबॅक करणार?
किंग कोहली ॲडिलेडचा राजा, विराटच्या रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, टीम इंडिया कमबॅक करणार? 
WI vs BAN : वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, पुरुष वनडे मॅचमध्ये 50 ओव्हर फिरकीपटूंनी टाकल्या, क्रिकेट इतिहासात पहिली घटना
ऐकावं ते नवल...वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम,  बांगलादेश विरुद्ध 300 बॉल फिरकीपटूंनी टाकले  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Fire: बारामतीतील भंगार गोदामाला भीषण आग, धुराच्या लोटामुळे वाहतुकीवर परिणाम
Nalasopara Fire: नालासोपारा पूर्वेकडील गोदामांना भीषण आग, चार गोदामं जळून खाक
UP BJP Leader: 'त्या तरुणाला जमिनीवर नाक घासायला लावलं', Meerut मधील भाजपा नेत्याची भररस्त्यात गुंडगिरी
Diwali Temple : विठ्ठल मंदिराला 2 टन फुलांची सजावट, शिर्डी-कोल्हापुरातही भाविकांची अलोट गर्दी
Maratha Reservation : 'सरकारचे कपडे फाडावे लागतील', मनोज जरांगेंचा शेतकऱ्यांसाठी नव्या आंदोलनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
IND vs AUS : विराट कोहली ॲडिलेडचा किंग, दमदार रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, दुसऱ्या वनडेत टीम इंडिया कमबॅक करणार?
किंग कोहली ॲडिलेडचा राजा, विराटच्या रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, टीम इंडिया कमबॅक करणार? 
WI vs BAN : वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, पुरुष वनडे मॅचमध्ये 50 ओव्हर फिरकीपटूंनी टाकल्या, क्रिकेट इतिहासात पहिली घटना
ऐकावं ते नवल...वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम,  बांगलादेश विरुद्ध 300 बॉल फिरकीपटूंनी टाकले  
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Asia Cup Trophy : मोहसीन नक्वीचं नवं नाटक, BCCI च्या कोणत्याही प्रतिनिधीला ट्रॉफी देणार, भारत ICC कडे जाणार
बीसीसीआयच्या कोणत्याही प्रतिनिधीनं दुबईत यावं, माझ्या हातानं ट्रॉफी देतो, मोहसीन नक्वीचा नवा डाव, भारत ICC कडे दाद मागणार
Tata Trust : टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड, मेहली मिस्त्रींचं काय होणार
टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड
Embed widget