Coronavirus Cases Today : राज्यात कोरोनाचा परतीचा प्रवास! गेल्या 24 तासांत राज्यात 29 नवीन रुग्णाची नोंद
Maharashtra Coronavirus Cases Today : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 751 इतकी झाली आहे.
Maharashtra Coronavirus Cases Today : राज्यातील कोरोना रुग्णांची (Covid-19) संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. त्याचवेळी कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 751 इतकी झाली आहे. तर, मुंबईमध्ये फक्त 129 सक्रिय रुग्ण आहेत.
108 नव्या रुग्णाची भर
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी 89 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 29 नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्यात आतापर्यंत एकूण 79,86,087 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17% इतके झाले आहे.
राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या
राज्यात 24 तासांत एकूण 751 सक्रिय रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण पुण्यात आढळले आहेत. पुण्यातील सक्रिय रूग्णांची संख्या 283 वर पोहोचली आहे. पुण्याच्या पाठोपाठच मुंबईत कोरोना रूग्णाची संख्या 129 वर गेली आहे. तर ठाण्यातील सक्रिय रूग्णांची संख्या 115 वर पोहोचली आहे.
आज कुठे किती रुग्ण आढळले?
राज्यात आज 81,35,242 नवीन कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. तर, कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 79,86,087 वर पोहोचली आहे. तर, कोरोनातून मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या 01,48,404 वर पोहोचली आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे सिंधुदूर्ग, नंदुरबार., धुळे, हिंगोली, वर्धा, गोंदिया या ठिकाणी एकही कोरोना रूग्ण आढळून आलेले नाहीत.
कोरोना रूग्णांचा साप्ताहिक आढावा
दिनांक 7 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2022 आणि 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या मागील दोन आठवड्यांचा आढावा घेतला असता कोव्हिड रूग्णांमध्ये 1037 पासून 773 पर्यंत म्हणजेच 25.46 टक्के घट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांच्या परिस्थितीचा वेग मंदावताना दिसतोय.
महत्वाच्या बातम्या :