Raj Thackeray : राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन, लवकरच मनसे पदाधिकाऱ्यांचा राज्यभर दौरा
Raj Thackeray : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच मनसेचे सर्व नेते राज्यभर दौरा करणार, असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
मुंबई : हिंदूत्त्वाच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आता पक्षांतर्गत मंथनाकडे अधिक लक्ष दिल्याचं पाहायला मिळतं. आज मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा पार पडला मेळाव्याला मनसेचे बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच सर्व नेते मंडळीच्या राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, आजचा मेळावा हा संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा होता.फक्त तीन कारणांसाठी आयोजित केला होता. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच सर्व नेते मंडळीच्या राज्यभर दौरा चालू होणार आहे.तसेच सरचिटणीस आणि उपाध्यक्ष राज्यभर दौरा करणार आहे. प्रत्येक जिल्हा तालुक्यात स्थानिक पातळीवरचे प्रश्न आणि आढावा मनसे नेते घेणार आहे. राज्यभरात सदस्य नोंदणी केली जाणार आहे
राज ठाकरे भोंग्य संदर्भातील भूमिकेबद्दल एक पत्रक देणार आहे. हे पत्र सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना करण्यात आली आहे.तसेच कोणत्याही कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर वक्तव्य करू नये अशी सूचना राज ठाकरे यांनी आज मेळावा केले आहेत. फक्त प्रवक्ते पक्षाची भूमिका सर्वत्र मांडतील, अशी माहिती देखील बाळा नांदगावकर यांनी दिली.
खासदार बृजभूषण सिंहांविरोधात मनसेची पोलिसात तक्रार
राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पाच जून रोजी अयोध्या दौरा (Ayodhya Tour) होणार होता. या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी या दौऱ्याला विरोध केला होता. बृजभूषण आणि कार्यकर्त्यांनी थेट मनसे अध्यक्ष यांना 'चुहा है' म्हणत टीका केली होती. बृजभूषण सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीची टीका करत थेट आव्हान दिलं होतं. याविरोधात मुंबईत मनसेकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आजच्या मेळाव्यात देखील अयोध्या दौऱ्याबाबत कुठलंही वक्तव्य न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
संबंधित बातम्या :