Maharashtra Rains Live Updates: आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Maharashtra Rains Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Rains Live Updates: आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्यात.
पूरग्रस्तांच्या मदतीला धावला विठुराया .. मुख्यमंत्री सहायता निधीस विठ्ठल मंदिराकडून 1 कोटीची मदत
ब्रेकिंग
Anchor -- पूरग्रस्तांच्या मदतीला धावला विठुराया .. मुख्यमंत्री सहायता निधीस विठ्ठल मंदिराकडून 1 कोटीची मदत ..
पुरग्रस्त नागरिकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून महावस्त्रे देखील वाटप केली जाणार
V/O -- राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहेत. या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले आहे.
यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंदिर समिती बैठकीत घेण्यात आला.
पूरग्रस्त भागातील नागरिकांचे उभे संसार वाहून गेल्याने हजारो बाधितांना अंगावर घालायला कपडे देखील नाहीत. यामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. याचाच विचार करून पुरग्रस्त नागरिकांना विठुरायाच्या प्रसादरूपाने महावस्त्रे देखील वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.
मंदिर समिती प्रत्येकवेळी पुरग्रस्त नागरिकांना फुड पॅकेट वाटप करीत असते. ह्यावेळी जिल्हा प्रशासनास देखील आवश्यक ती मदत करण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यावर आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे. विशेष म्हणजे सन 2013, 2015, 2018 व 2020 या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती.
नाथसागरातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीला पूर
बीड: नाथसागरातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीला पूर; नदीकाठच्या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गावाला वेढा पडल्यानंतर गावातून बाहेर पडण्यासाठी मार्गच राहणार नाही.. मुद्दामहून पाणी सोडून मारायचे का?
ज्यावेळी आम्ही पिकांसाठी पाणी मागितले.. त्यावेळी वरच्या लोकांनी म्हणायचं आमच्या हक्काचं पाणी सोडणार नाही..
आता त्यांच्या हक्काचं पाणी कुठे गेलं.. आता मारण्यासाठी पाणी सोडता का?
शंभर टक्के धरण भरल्यानंतर पाणी सोडता.. हे चुकीचे आहे..
आम्हाला विश्वासात घेऊन जायकवाडीतून पाणी सोडायला पाहिजे होतं.. अचानक पाणी सोडल्याने आम्ही घाबरून गेलो आहोत..
आधीच पाणी असल्याने आम्ही काय करायचं..
घरात वृद्ध आहेत.. अचानक पाणी आले तर आम्ही काय करायचं.. प्रशासनाने काहीही सांगितलं नाही..
आता बाहेर पडायला मार्ग नाही.. वरतून पाऊस पडतो.. अनिल गोदावरी पाणी आहे..
पाणी सोडण्याआधी आम्हाला सांगायला पाहिजे होतं..
गोदावरी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ आपल्या वेदना सांगत आहेत...
शेतामध्ये पाणी आहे.. प्रशासनाचे कोण्ही नाही..
गोदावरी नदीकडच्या नागझरी गावातून आढावा...
























