(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra rain Updates : मुंबईसह राज्यात हलक्या पावसाच्या सरी, ढगाळ वातावरणाचा अंदाज
Maharashtra Monsoon Updates : आज मुंबईसह राज्यात हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या आहेत. दिवसभर ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
Maharashtra Weather Updates : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पहाटेच पावसानं हजेरी लावली. मुंबईसह राज्यात पहाटे हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. तर काही भागांमुळे पहाटे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबई आणि ठाण्यातही काही भागांमध्ये पहाटे जोरदार पाऊस झाला, आता सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसानं उघडीप दिली असून, ऊन पडलं आहे.
राज्यात काही ठिकाणी पावसाची रिपरिप
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह काही ठिकाणीत पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. अंशतः ढगाळ वातावरण राहिल. काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू राहील. तर 30-31 ऑगस्ट दरम्यान राज्यात विदर्भात, सलग्न मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच 1 आणि 2 सप्टेंबरला घाटमाथ्यावर अशाच हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील.
30-31 ऑगस्ट दरम्यान राज्यात विदर्भात, सलग्न मराठवाडा, द.मध्य महाराष्ट्र हलका ते मध्यम पावसांची शक्यता. IMD GFS मोडेल नुसार.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 29, 2022
1,2 ला पण अशीच स्थिती राहण्याची शक्यता. घाट भागात पण. pic.twitter.com/sQQoMiaSmQ
देशाची पावसाची परिस्थिती
देशातील काही राज्यं वगळता उर्वरित राज्यांमध्ये मुसळधार पावसापासून दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) अरुणाचल प्रदेश, नागालँड, पूर्व आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये एका दिवसात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सप्टेंबरपासूनच सुरु मान्सूनचा परतीचा प्रवास
गेल्या वर्षी रेंगाळलेला मान्सून (Monsoon) यावर्षी मात्र 15 दिवस आधीच निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरु करेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एरवी मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून सुरु होतो आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. मात्र, यावर्षी 15 दिवस आधीच मान्सून निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: